अकोला - तेल्हारा तालुक्यातील वान धरण शंभर टक्के भरल्याने आज दोन दरवाजे १० सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. या दोन दरवाजामधून 700 क्यूसेकने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नदीकाठच्या गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चिन्मय वाकोडे यांनी दिली.
तेल्हारा तालुक्यातील वान धरण सातत्याने सुरू असलेल्या पावसा मुळे शंभर टक्के भरले आहे. वान प्रकल्पमध्ये मेळघाट जंगलाचा परिसर आणि इतर स्रोतानमधून पाणी साठा तयार होतो. काही दिवस पूर्वी वान प्रकल्पमधून दरवाजा उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. पुन्हा वान प्रकल्प हा शंभर टक्के भेरल्याने या प्रकल्पामधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. वान प्रकल्पाचे 2 दरवाजे हे 10 सेंटी मिटर नि उघडण्यात आले आहेत. याप्रकल्पातू अंदाजे 700 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. या प्रकल्प अंतर्गत नदी काठच्या 17 गावाना आपत्ती विभाग आणि पाठबंधारे विभागा अतर्गत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी काठच्या गावकऱ्यांनी सतर्क राहून कामकाज करावे, असे आवाहन पाटबंधारे विभागचे कार्यकारी अभियंता चिन्मय वाकोडे यांनी सांगितले.