अकोला - मोहता मिल परिसरात असलेल्या केंद्रीय गोदामाच्या आवारात उभ्या ट्रकला आग लागली. ही आग मोठ्या प्रमाणात पसरली. या आगीच्या रौद्ररूपामुळे संपूर्ण ट्रक जळून खाक झाले. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. सुदैवाने या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही.
राजस्थान येथून धान्य घेऊन आलेला ट्रक क्रमांक आरजे 11 जीबी 1572 मधील माल उतरल्यानंतर केंद्रीय गोदाम परिसरामध्ये मोकळ्या ठिकाणी उभा होता. ट्रक वजन करून परत आपल्या प्रवासाला निघणार होता. दुपारी या ट्रकला अचानक आग लागली. या आगीत ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. आग लागताच अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले होते. परंतु, आगीचे रौद्ररूप असल्याने हा ट्रक अग्निशमन दल येण्याआधीच पूर्णपणे जळून खाक झाला. या आगीमध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही. अग्निशमन दलाने आग विझविले आहे.