ETV Bharat / state

कचरा वेचणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; तिघांना आजन्म कारावास - child abuse akola news

रामदास पेठ पोलीस ठाण्यांतर्गत त्रिवनेश्वर कॉम्प्लेक्सजवळ १५ एप्रिल २०१७ ला सायंकाळी ५ दरम्यान एका अल्पवयीन मुलीला पैशाचे आमिष दाखवून तिघांनी अनैसर्गिक अत्याचार केला होता. या तिन्ही आरोपींना शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तसेच दंडही ठोठावला. पीडित मुलीला सरकारकडून १० लाख रुपये मोबदला देण्याचे आदेशही दिले.

कचरा वेचणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

author img

By

Published : Mar 13, 2020, 4:58 PM IST

Updated : Mar 13, 2020, 5:37 PM IST

अकोला - रामदास पेठ पोलीस ठाण्यांतर्गत त्रिवनेश्वर कॉम्प्लेक्समध्ये कचरा वेचणाऱ्या अल्पवयीन मुलीवर(वय १२) तिघांनी सामूहिक अत्याचार केला होता. या तिन्ही आरोपींना शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तसेच दंडही ठोठावला. पीडित मुलीला सरकारकडून १० लाख रुपये मोबदला देण्याचे आदेशही दिले. गोविंद साखरे, शेख मुश्तकीम आणि मोहम्मद मोहसीन अशी या आरोपींची नावे आहेत.

कचरा वेचणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचारातील तीन आरोपींंना जन्मठेपेची शिक्षा

रामदास पेठ पोलीस ठाण्यांतर्गत त्रिवनेश्वर कॉम्प्लेक्सजवळ १५ एप्रिल २०१७ ला सायंकाळी ५ दरम्यान एक अल्पवयीन मुलगी(वय १२) कचरा वेचत होती. दरम्यान, कॉम्प्लेक्सजवळ बसलेल्या गोविंद परशराम साखरेने तिला पैशांचे आमिष दाखविले. तसेच या कॉम्प्लेक्सच्या तिसऱ्या मजल्यावर जा, तिथे दोघेजण बसलेले आहेत. ते तुला आणखी पैसे देतील, असे आमिष दाखवले. पैशांच्या लालसेपोटी ती अल्पवयीन मुलगी कॉम्प्लेक्सच्या तिसऱ्या मजल्यावर गेली. यावेळी बसलेल्या शेख मुश्तकीम अब्दुल जाकीर तथा मोहम्मद मोहसीन मोहम्मद अनवर कुरैशी यांनी तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. त्यांनतर हे तिघे तिथून पळून गेले.

याबाबत माहिती मिळताच रामदास पेठ पोलीस महिला उपनिरीक्षक विद्या लांडे यांनी घटनास्थळ गाठून पीडित मुलीला उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी याप्रकरणी पोक्सो, ऑट्रासिटीसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. शहर उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार प्रकाश सावकार, महिला पोलीस उपनिरीक्षक विद्या लांडे, दिलीप पोटभरे यांनी तपास पूर्ण करून दोषारोप पत्र दाखल केले.

हेही वाचा - अकोल्यातील चतारी गाव मूत्रपिंड विकारग्रस्त; आरोग्य यंत्रणा ठरतेय निष्फळ

हे प्रकरण प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आय. आरलैंड यांच्या न्यायालयात चालले. सरकार पक्षातर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर तिन्ही आरोपींना न्यायालयाने दोषी ठरविले आणि तिघांनाही मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील आरआर देशपांडे यांनी युक्तिवाद केला. तसेच न्यायालयाने पीडित अल्पवयीन मुलीला सरकारतर्फे १० लाख रुपये मोबदला देण्याचे आदेश दिले.

या प्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक लांडे यांची साक्ष महत्वाची ठरली. पीडित मुलीला घटनास्थळावरून उचलून नेऊन रुग्णालयात दाखल करणाऱ्या व तिला घटनेनंतर पाहणाऱ्या त्या पहिल्या व्यक्ती होत्या.

हेही वाचा - पातुर नगरपरिषदेच्या रेकॉर्ड रुमला आग, महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक

Last Updated : Mar 13, 2020, 5:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.