ETV Bharat / state

राज्य सरकारचे पॅकेज फसवे, प्रा. धैर्यवर्धन पुंडकर यांचा आरोप

राज्यात 22 जुलै रोजी अतिवृष्टी झाली. यामधील नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी राज्य सरकारने 12 हजार कोटींचे पॅकेज दिले. हे पॅकेज फसवे असून याआधी भाजपा सरकारने दिलेले पॅकेजही फसवे होते. त्यातील मदत अद्यापही नागरिकांना मिळाली नसल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. धैर्यवर्धन पुंडकर यांनी आज केला आहे.

'राज्य सरकारचे पॅकेज फसवे'
'राज्य सरकारचे पॅकेज फसवे'
author img

By

Published : Aug 5, 2021, 5:48 PM IST

अकोला - राज्यात 22 जुलै रोजी अतिवृष्टी झाली. यामधील नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी राज्य सरकारने 12 हजार कोटींचे पॅकेज दिले. हे पॅकेज फसवे असून याआधी भाजपा सरकारने दिलेले पॅकेजही फसवे होते. त्यातील मदत अद्यापही नागरिकांना मिळाली नसल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. धैर्यवर्धन पुंडकर यांनी आज केला आहे.

राज्य सरकारचे पॅकेज फसवे, प्रा. धैर्यवर्धन पुंडकर यांचा आरोप

'जाहीर केलेले पॅकेज फसवे आहे'

जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्याशी नुकसानसंदर्भात निवेदन देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे शिष्टमंडळ आले होते. यावेळी वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. धैर्यवर्धन पुंडकर बोलत होते. पुढे ते म्हणाले, राज्यात झालेल्या ढगफुटीमुळे हाहाकार माजला आहे. तरीही हे सरकार झोपलेले आहे. शासनाने जे 12 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे, ते फसवे आहे. याआधी भाजप सत्तेत असताना त्यांनीही पॅकेज जाहीर केले होते. त्याचीही मदत अद्यापपर्यंत नागरिकांना मिळालेली नाही. याही पॅकेजमध्ये जो अन्याय सुरू आहे, पूरपीडितांचा सर्व्हे व्यवस्थित होत नाही. नुकसानीचे पंचनामेही होत नाही. खरडून गेलेल्या जमिनीचे सर्व्हे होत नाही. ते दुर्लक्षित होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

'पूरग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज 100 टक्के माफ व्हावे'

शासनाला जाग यावी म्हणून वंचित बहुजन आघाडीने 7 ऑगस्टपर्यंत हा आक्रोश शासनापर्यंत पोहोचावा, यासाठी आम्ही येथे आलो आहे. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या समक्ष शेतकऱ्यांची कैफियत मांडली. प्रामुख्याने पूरपीडित शेतकऱ्यांचे कर्ज शंभर टक्के माफ व्हायला पाहिजे, त्यांच्याकडून वीज वसुली थांबविली पाहिजे, त्यांच्या बांधावर बियाणे पोहोचविले पाहिजे, या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, महिला आघाडी प्रदेश महासचिव अरूंधतीताई शिरसाट, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महीला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने यांच्यासह आदी उपस्थित होते.

हेही वाचा - एकमेकांची पाठ खाजवतात, तेच महाविकास आघाडीचे जास्त आवडते - अमृता फडणवीस

हेही वाचा - लोकसभा निवडणूक समोर ठेऊन मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्राने टोलवला राज्याच्या कोर्टात?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.