अकोला - हिवरखेड परिसरात कत्तलीकरिता गौवंशाची वाहतूक करणाऱ्या १८ पिकअप वाहनांना अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखाने पकडले आहे. या दरम्यान अंदाजे ७० ते ८० गौवंशाची सुटका करण्यात आली.
अकोल्यातील हिवरखेड परिसरात कत्तलीकरिता गौवंशाची वाहतूक करणाऱ्या १८ पिकअप वाहनांना अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखाने पकडले आहे. या दरम्यान गौवंशाची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी वाहन चालकासह काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर काही जण घटनास्थळावरून पसार झाले आहेत.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत ममता वादे पोलीस कर्मचारी अब्दुल माजिद, शेख हसन, इजाज अहमद, रवी इरचे, संदीप कटाकर, भाऊलाल हेबार्डे, मनोज नागमते, अभय बावस्कर, ढोरे यांनी केली आहे. हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे.