ETV Bharat / state

पैशाच्या कारणावरून एकाचा खून, आरोपी दोन तासांतच अटकेत - अकोला पोलीस बातमी

अकोट फाइल पोलीस ठाण्याच्या हद्दील असलेल्या आपातापा रस्त्यावरील रेल्वे क्वार्टरमध्ये एकाचा खून झाल्याची घटना दुपारी दोन वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला दोन तासांतच अटक केली आहे.

Murder of one for money in Akola district
घटनास्थळ
author img

By

Published : Mar 13, 2021, 7:26 PM IST

अकोला - यावलखेड शेत शिवारातील अर्धवट जळालेल्या महिलेच्या मृत्यूच्या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात होत नाही, तोच अकोट फाइल पोलीस ठाण्याच्या हद्दील असलेल्या आपातापा रस्त्यावरील रेल्वे क्वार्टरमध्ये एकाचा खून झाल्याची घटना दुपारी दोन वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

घटनास्थळ

आरोपी अटकेत

नरेश मंगवाने, असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सोहम उर्फ बुंद उत्तम गायकवाड याने त्यांचा चाकूने भोसकून खून केला आहे. अकोट पोलिसांनी आरोपी सोहम गायकवाड यास अटक केली आहे.

वादातून चाकू खूपसला पोटात

अकोट फाइल पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या आपातापा रस्त्यावरील रेल्वे क्वार्टरमध्ये नरेश मंगवाने व सोहम गायकवाड हे दोघे बोलत होते. त्यांच्यात पैशाच्या कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने सोहम गायकवाडने त्याच्या जवळ असलेला चाकू नरेश मंगवाने यांच्या पोटात खुपसला. त्यामध्ये नरेश यांचा जागीच मृत्यू झाला.

अवघ्या दोन तासांत आरोपी ताब्यात

या घटनेची माहिती मिळताच अकोट फाइल पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृत नरेश मंगवाने याचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठविला. घटनास्थळावरून पसार झालेल्या सोहम गायकवाड यास अकोट फाइल पोलिसांनी अवघ्या दोन तासात अटक केली. त्याची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.

या प्रकरणी अकोट फाइल पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये इतर आरोपींचा समावेश असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त होत आहे.

हेही वाचा - यावलखेड शेत शिवारात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह

हेही वाचा - जिल्हा स्त्री रुग्णालयातून उत्तम दर्जाच्या सुविधा देणार - पालकमंत्री बच्चू कडू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.