ETV Bharat / state

Encouraging Students Talents through Akola : स्वयंशिस्तीच्या कार्याने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना स्नेहसंमेलनातून वाव - संस्कारांचा विद्यार्थ्यांनाही अनुभव

ज्याप्रमाणे आपली आई ही मुलाला तयार करण्यासाठी नानाविध कष्ट करते. त्या कष्टाचा आणि संस्कारांचा विद्यार्थ्यांनाही अनुभव (Experience of Sanskars for students too) यावा, या दृष्टीने कौलखेड परिसरातील एका शाळेने स्वयंशिस्तीचे धडे देण्याचा प्रयत्न (attempt to teach self discipline lessons) स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून केला. निमित्त ठरले ते सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे (Savitribai Phule Jayanti). या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतः धुनी, भांडी ते स्वयंपाकापर्यंतची तसेच बाजारातील भाजी विक्रेते व खाद्यपदार्थ विक्रेत्यांची भूमिका पार पाडली. संपूर्ण शाळेतील विद्यार्थी या उपक्रमामध्ये सहभागी होते (Encouraging Students Talents through Akola). पालकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. (Latest news from Akola)

Encouraging Students Talents through Akola
साहित्य विक्री करताना विद्यार्थिनी
author img

By

Published : Jan 10, 2023, 7:34 PM IST

अकोला : ग्रामीण भागातील आईपण चुलीवर स्वयंपाक करतात. वरवटा, जाते यावर कडधान्य भरडतात. ही कामे ग्रामीण भागात केल्या जातात. मात्र, या कामांनाही आता डिजिटल युगामध्ये विसर पडलेला आहे. (Experience of Sanskars for students too) त्यामुळे विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील जीवन आणि इलेक्ट्रॉनिक साधने नसताना आजी कशाप्रकारे स्वयंपाक करायच्या; (attempt to teach self discipline lessons) या सर्व गोष्टींचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना मिळावे व त्यांना त्याची अनुभूती यावी, (Savitribai Phule Jayanti) या दृष्टिकोनातून कौलखेड परिसरातील मा रेणुका मराठी प्राथमिक शाळा तथा रेणुका किड्स प्री प्रायमरी स्कूलमधील (Encouraging Students Talents through Akola) विद्यार्थ्यांना घरातील आई-वडील जी कामे करतात ती सर्व कामे त्यांच्याकडून करून घेण्यात आली. (Latest news from Akola)

डिजिटल युगामध्ये नव्या पद्धतीची क्रांती : लहान मुलांना पहाटे शाळेत जाण्यासाठी उठवन्यापासून तर शाळेत पोहोचविण्यापर्यंतच्या संपूर्ण कामांमध्ये आईची डोकेदुखी होते. मुलाला उठल्याबरोबर त्यांचे दात घासणे, त्यांची आंघोळ करणे, कपडे घालून देणे, त्यांचेसाठी जेवण तयार करणे एवढेच नव्हे तर त्यांना शाळेत पोहोचून देण्याचे पण कार्य हे आई-वडिलांना करावे लागते. यामध्ये आईची भूमिका ही सर्वांत जास्त असते तसेच तिला ती थकविण्यासारखी असते. सावित्रीबाई फुले यांनी ज्याप्रमाणे समाजामध्ये महिलांना शिक्षणातच नव्हे तर सर्वच गोष्टींमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी जी क्रांती घडवली. त्याच पद्धतीची क्रांती डिजिटल युगामध्ये लहानपणापासून विद्यार्थ्यांना जुन्या साधनांचा उपयोग करून आपले जीवन स्वयंशिस्तीने जगता यावे व डिजिटल साधनांवर अवलंबून न राहता आपली स्वतःची कामे स्वतः करता यावी, या दृष्टिकोनातून शाळेमार्फत हा उपक्रम राबविला होता.

मुलांनी विकले साहित्य : यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः चुलीवर पोळ्या तयार केल्या. भाकरी भाजल्या. भाजी पण चुलीवरच केली. त्यासोबतच चहापण चुलीवर केला. यामध्ये मुलीच नव्हे तर मुलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता. मुलांनी तयार केलेल्या पोळ्या व भाकरींचा त्यासोबतच भाजीचा आस्वाद पालकांनी व शाळेतील शिक्षकांनी घेतला. आईला स्वयंपाक करताना येणाऱ्या अडचणीचा अनुभव यावेळी विद्यार्थ्यांनाही आला. काही मुलांनी अक्षरशः भाजी विकली. काहींनी खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून ते विक्री केले. तर काही मुलींनी कागदांच्या थैली करून त्या विकल्या. तर हाताला काम असावे या दृष्टिकोनातून काही मुलींनी तर स्वेटर विनले, पायदान विणले. यासोबतच काही मुलींनी फुलांचे गजरे विकले. तर काही विद्यार्थ्यांनी नानाविध प्रकारची पुस्तके विक्री करण्याचा छोटासा स्टॉलही लावला होता. शाळेच्या पटांगणामध्ये हा सर्व स्वयंशिस्तीचा धडा विद्यार्थ्यांना पालकांच्या समक्ष देण्यात येत होता.

मुलांकडून प्रात्यक्षिक : तर दुसऱ्या बाजूला लहान मुलांना स्वतः कपडे घालता आले पाहिजे, त्यांना स्वतःचा पायात बूट मोजा घालता यावा, याचे प्रात्यक्षिकही त्यांच्याकडून करून घेण्यात आले. सोबतच शाळेमध्ये असलेल्या ग्रंथालयात विद्यार्थ्यांचा पुस्तक वाचनाची आवड निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना पुस्तक वाचनाची संधीही देण्यात आली. विद्यार्थ्यांना कपडे कशी घडी करतात हे पण शिकविण्यात आले. कपडे धुण्याचे पण प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आले. यासह घरातील सर्वच कामे या अनोख्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आली.

मुलांना स्वावबंबी बनविण्यासाठी उपक्रम : विद्यार्थ्यांना स्वयंशिस्तीचे धडे लहानपणापासूनच मिळावे व ते पालकांवर अवलंबून न राहता स्वतःची कामे स्वतःच करावी या दृष्टिकोनातून सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने शाळेत हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. त्या प्रतिसादाला पालकांनीही आवर्जून भेट देऊन विद्यार्थ्यांनी तयार केलेले अन्न हे खाऊन पाहिले. विद्यार्थ्यांच्या या कौतुकास्पद कामगिरी पाहताना पालकांचेच नव्हे तर शिक्षकांच्याही डोळे पानावले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.