अकाेला - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्रशासनाची तपासणी पथके सक्रिय झाली असून बुधवारी रात्री अकाेला-मंगरूळपीर राेडवर निवडणूक आयोगाच्या पथकाने पाच लाख ३८ हजार रुपये जप्त केले आहेत. ही कारवाई आचारसंहिता लागू झाल्यानंतर अकोला जिल्ह्यातील पहिलीच कारवाई आहे.
हेही वाचा - गडचिरोलीत सी-60 जवान-नक्षलवाद्यांमध्ये चकमक
जप्त केलेली रक्कम सध्या जमा केली असून, गुरुवारपासून चाैकशीची प्रक्रिया सुरु हाेणार आहे. चाैकशीअंती पुढील कार्यवाहीचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे.
विधानसभेच्या मूर्तिजापूर मतदारसंघात येणाऱ्या कासमार पाॅईंटवर तपासणी पथक कार्यरत हाेते. या पथकाने एक चारचाकी वाहन थांबवले. वाहनात असलेल्या अकाेला येथे राहणाऱ्या व्यापाऱ्याकडून ५ लाख ३८ हजार रुपये जप्त केले आहेत. यात १०, २००, ५०० रुपयांच्या नाेटांचा समावेश आहे. बेसन व्यावसायिक असलेल्या या व्यापाऱ्याने ही रक्कम वाशिम जिल्ह्यातील अनेक तालुके, गावांमधील व्यापाऱ्यांकडून व्यवहारापाेटी जमा केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, सखाेल चाैकशीअंतीच सर्व बाबी स्पष्ट हाेणार आहे.
हेही वाचा - ईडीचा पाहूणचार स्वीकारण्यासाठी जाणार, पवारांनी केले स्पष्ट