ETV Bharat / state

अकोला : आगीतून वाचण्यासाठी मजुरांची इमारतीच्या छतावरून उडी - दालमिल आग

छतावर झोपलेल्या मजुरांनी खाली येण्यासाठी त्यांना मार्ग सुचला नाही, किंबहुना इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात धूर आणि गॅस निर्माण झाल्यामुळे त्यांनी थेट छतावरूनच खाली उडी मारली. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहे.

अकोला आग
अकोला आग
author img

By

Published : Aug 16, 2021, 5:06 PM IST

Updated : Aug 16, 2021, 5:24 PM IST

अकोला - एमआयडीसी 4 मधील एस.के. दालमिलला रविवारी मध्यरात्री आग लागली. या आगीमध्ये दालमीलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवळपास दहा ते पंधरा गाड्या दाखल झाले होते. या आगीमधून आपला जीव वाचवण्यासाठी मजुरांची मात्र धावपळ झाली. दोन मजुरांनी तर थेट छतावरून उडी घेत आपला जीव वाचवला आहे. त्यात ते जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल करण्यात आले आहे.

आगीतून वाचण्यासाठी मजुरांची इमारतीच्या छतावरून उडी

काय आहे घटना?

एमआयडीसीमध्ये असलेल्या एस के दालमिलला मध्यरात्री आग लागली. ही आग नेमकी कशामुळे हे अद्याप समजू शकले नाही. दरम्यान, ही आग दालमिलच्या तीनही मजल्यापर्यंत पोहोचली. ही आग एवढी भीषण होती. त्यामुळे या आगीत दालमिलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनास्थळी एमआयडीसी पोलीस दाखल झाले होते. या आगीत अडकलेल्या मजुरांनी आपला जीव वाचवण्यासाठी धावपळ केली. काही मजूर हे दालमिलच्या इमारतीमध्ये झोपलेले होते. तर दोन ते तीन मजूर हे छतावर झोपली होते. आग लागल्यामुळे इमारतीमध्ये धूर निर्माण झाला होता. काही मजुरांनी धूर कमी असताना आपला जीव वाचवण्यासाठी दरवाजा उघडून बाहेर पळ काढला. तर छतावर झोपलेल्या मजुरांनी खाली येण्यासाठी त्यांना मार्ग सुचला नाही, किंबहुना इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात धूर आणि गॅस निर्माण झाल्यामुळे त्यांनी थेट छतावरूनच खाली उडी मारली. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहे. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल करण्यात आले आहे. नंदू आणि विकास असे जखमी झालेल्या मजुरांचे नाव आहे. हे सर्व मजूर बिहारचे रहिवासी आहेत. दरम्यान, या आगीमध्ये किती नुकसान झाले हे अद्याप कळू शकले नाही. अग्निशामन दलाने ही आग आटोक्यात आणली आहे.

हेही वाचा-VIDEO : सर्वाेच्च न्यायालयासमोर एका दाम्पत्याचा आत्महनाचा प्रयत्न

Last Updated : Aug 16, 2021, 5:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.