अकोला - शहरातील डॉक्टर आणि औषध विक्रेते रुग्णांना योग्य बिले व प्रिस्कीपशन देत नाहीत. याप्रकरणी मी तपास करण्या संबधी पोलिसांकडे तक्रार केली होती.परंतु त्यांची चौकशी न करता पोलिसांनी माझ्यावरच खोटा गुन्हा दाखल केला आहे. तसेच याप्रकरणी जाणून बुजून पोलीस व औषध विक्रते मला त्रास देत आहेत, याकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेख रमजान शेख रुस्तम यांनी तीनचाकी सायकल रिक्षावर बसून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.
नायगाव प्रभाग क्रं. एक परिसरातील डॉक्टर हे रुग्णांना चिठ्ठी लिहून देत असताना सही आणि मोबाईल नंबर लिहून देत नाही. तसेच या परिसरातील मेडिकल दुकानातून पक्के बिल मिळत नाही. याबाबत तक्रार केल्याने संबधित विभाग त्यामध्ये कारवाई करत नाही. तसेच पोलीस ही कारवाई करण्यास इच्छुक नाही. पोलीस जबाब किंवा बयान घेतो असून वाचून दाखवीत नाही. तसेच कोऱ्या कागदावर स्वाक्षरी मागत आहे. माझ्यावर लावण्यात आलेले आरोप सिध्द करण्यासाठी संबधित यंत्रणेने त्या दुकानातील सीसीटीव्ही तपासून बघावेो. मी दोषी आढळल्यास माझ्यावर कारवाई करावी. परंतु, पोलीस तसे करत नसून मला त्रास देत आहेत.
या प्रकरणी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन व बेमुदत उपोषणाची नोटीस देऊन ही कारवाई करण्यास तयार नाहीत. त्यामुळे मी या उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यामुळे दोषींवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी शेख रमजान शेख रुस्तम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.