ETV Bharat / state

अकोल्यात वाऱ्यासह पावसाची हजेरी; सर्व अधिकाऱ्यांना मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश

महाराष्ट्रात धडकणाऱ्या निसर्ग चक्रिवादळामुळे अकोला जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आपत्ती व्यवस्थापनासह सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

rain in akola
पावसामुळे रस्त्यावर साचलेले पाणी
author img

By

Published : Jun 3, 2020, 8:14 AM IST

अकोला - वेधशाळेने चक्रीवादळाचा इशारा दिल्यानंतर मंगळवारी (दि. 2 जून) दिवसभर ढगाळ वातावरण होते. रात्री साडेआठ नंतर वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. तसेच जिल्हा प्रशासनाकडूनही सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

निसर्ग चक्रीवादळाचा इशारा देशभरामध्ये देण्यात आलेला आहे. महाराष्ट्रालाही याचा मोठा फटका बसणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या चक्रीवादळाचा फटका मराठवाडा आणि विदर्भालाही बसणार असल्याची शक्यता आहे.

मंगळवारी रात्री झालेल्या जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान वेधशाळेने दिल्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आपत्ती व्यवस्थापनासह सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. या चक्रीवादळामुळे जर नुकसान झाले तर त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या आहेत.

हेही वाचा - अवैध सावकारी प्रकरण : सहकार विभागाच्या छाप्यात बाँड, खरेदीखत, धनादेश आढळले

हेही वाचा - अकोल्यात जनतेनेच नाकारला ‘जनता कर्फ्यू’, पालकमंत्र्यांनी काढले महत्त्वाचे पत्रक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.