ETV Bharat / state

वृद्ध महिलेकडून 2 हजारांची लाच घेणाऱ्या खासगी व्यक्तीला एसीबीकडून अटक - खासगी व्यक्तीला लाच घेताना अटक अकोला

तक्रारदार महिलेला श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच तलाठ्याचा उत्पन्नाचा दाखला आणि इतर सर्व कामे करून देण्यासाठी आरोपी ढोकेने वृद्ध महिलेला पैशाची मागणी केली. आरोपीने या कामासाठी 3 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

akola
वृद्ध महिलेकडून 2 हजारांची लाच घेणाऱ्या खासगी व्यक्तीला एसीबीने केली अटक
author img

By

Published : Feb 11, 2020, 12:17 PM IST

अकोला - श्रावणबाळ योजनेचे कार्ड बनवून देण्यासाठी 3 हजारांच्या लाचेची मागणी करणाऱ्या एका खासगी व्यक्तीवर अकोला लाचलुचपत विभागाने सोमवारी सायंकाळी सर्वोपचार रुग्णालयात कारवाई केली. वृद्ध महिलेकडून 2 हजार रुपये स्वीकारताना आरोपीला अटक केली आहे. सुहास मारोती ढोके, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या कारवाईमुळे सर्वोपचार रुग्णालयातील खासगी व्यक्तीच्या माध्यमातून होणारा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे.

वृद्ध महिलेकडून 2 हजारांची लाच घेणाऱ्या खासगी व्यक्तीला एसीबीने केली अटक

हेही वाचा - अकोल्यात भाजीबाजाराला आग; 20 दुकानांमधील लाखो रुपयांचा माल जळून खाक

65 वर्षीय तक्रारदार महिलेला श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच तलाठ्याचा उत्पन्नाचा दाखला आणि इतर सर्व कामे करून देण्यासाठी आरोपी ढोकेने वृद्ध महिलेला पैशाची मागणी केली. आरोपीने या कामासाठी 3 हजार रुपयांच्या लाच मागितली. 2 हजार रुपये रोख आणि खात्यामध्ये पैसे जमा झाल्यानंतर उरलेल्या 1 हजार रुपयांची त्याने मागणी केली. वृद्ध महिलेला ही रक्कम देणे योग्य न वाटल्याने तिने अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

हेही वाचा - सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे 50 हजारांची फसवणूक करणार्‍या नायजेरियन व्यक्तीला अटक

या तक्रारीची दखल घेत एसीबीने 9 फेब्रुवारीला तक्रारीची पडताळणी केली. पडताळणीनंतर ठरलेल्या ठिकाणी शासकीय सर्वोपचार रुग्णालय येथील बाह्यरुग्ण विभागाच्या नोंदणी कक्षासमोर एसीबीने सापळा लावला. त्यावेळी आरोपी ढोके हा तिथे आला. त्याने त्या वृद्ध महिलेकडून 2 हजार रुपये लाच स्वीकारली. यानंतर दबा धरून बसलेल्या एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याला रंगेहाथ पकडले.

Intro:अकोला - श्रावणबाळ योजनेचे कार्ड बनवून देण्यासाठी तीन हजाराची मागणी करणाऱ्या एका खाजगी व्यक्तीवर अकोला लाचलुचपत विभागाने सोमवारी सायंकाळी सर्वोपचार रुग्णालयात कारवाई केली. वृद्ध महिलेकडून दोन हजार रुपये स्वीकारताना त्याला अटक केली आहे. सुहास मारोती ढोके, असे त्या व्यक्तीचे नाव आहे. या कारवाईमुळे सर्वोपचार रुग्णालयातील खासगी व्यक्तीच्या माध्यमातून होणारा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे.

Body:65 वर्षीय तक्रारदार या महिलेला श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळवून देण्याकरता तसेच तलाठी यांचा उत्पन्नाचा दाखला व इतर सर्व कामे करून देण्यासाठी सुहास ढोके याने त्या वृद्ध महिलेवर प्रभाव टाकला. या पोटी त्याने तीन हजार रुपयाची लाचेची मागणी केली. दोन हजार रुपये रोख आणि खात्यामध्ये जमा झाल्यानंतर 1000 रुपये असे त्याने त्या वृद्ध महिलेला तीन हजार मागितले. दरम्यान, वृद्ध महिलेला ही रक्कम देणे योग्य न वाटल्याने तिने अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्या तक्रारीनंतर एसीबीने सात फेब्रुवारी रोजी पडताळणी केली. पडताळणीनंतर ठरलेल्या ठिकाणी शासकीय सर्वोपचार रुग्णालय येथील बाह्यरुग्ण विभागाच्या नोंदणी कक्षासमोर एसीबीने सापळा लावला. त्यावेळी खाजगी व्यक्ती सुहास ढोके हा तिथे आला. त्याने त्या वृद्ध महिलेकडून दोन हजार रुपये लाच स्वीकारली. यानंतर दबा धरून बसलेल्या एसीबीने सुहास ढोके याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

बाईट - एस. एस. मेमाणे
पोलिस उपअधीक्षक, अकोला एसीबी

--------*--------*-------*-------

सूचना - akola acb trap या नावाने रेडी टू पॅकेज करून एफटीपी केले आहे.

Conclusion:सूचना - akola acb trap या नावाने रेडी टू पॅकेज करून एफटीपी केले आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.