ETV Bharat / state

'तुम्ही राष्ट्रपती कधी होणार?' चिमुकलीचा पंतप्रधान मोदींना सवाल - छोट्या मुलीचा मोदींना प्रश्न

'तुम्ही राष्ट्रपती कधी होणार?' असा निरागस प्रश्न एका चिमुकलीने पंतप्रधान मोदींना विचरला आहे. ही चिमुकली अहमदनगर जिल्ह्याचे भाजप खासदार सुजय विखे यांची मुलगी असून, भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटलांची नात आहे. या प्रश्नामुळे खासदार सुजय आणि डॉ. धनश्री यांची मुलगी अनिषा ही चर्चेत आली आहे.

'मोदीजी तुम्ही राष्ट्रपती कधी होणार?' चिमुकलीचा पंतप्रधान मोदींना सवाल

author img

By

Published : Aug 12, 2021, 8:57 PM IST

अहमदनगर - "मोदीजी तुम्ही राष्ट्रपती कधी होणार?" असा निरागस प्रश्न एका चिमुकलीने पंतप्रधान मोदींना विचरला आहे. ही चिमुकली अहमदनगर जिल्ह्याचे भाजप खासदार सुजय विखे यांची मुलगी असून, भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटलांची नात आहे. या प्रश्नामुळे खासदार सुजय आणि डॉ. धनश्री यांची मुलगी अनिषा ही चर्चेत आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह त्यांचे कुटुंब

पंतप्रधानांनी मेलला उत्तर देत भेटीची वेळ दिली

आमदार राधाकृष्ण विखे, सुजय विखे, डॉ. धनश्री सुजय विखे हे अनिषाच्या हट्टाखातर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले. अनिषाने वारंवार आपले सुजय यांच्याकडे मोदींना भेटण्याचा आग्रह केला होता. या हट्टानंतर पंतप्रधानांना मेल करून या चिमुकलीला मोदींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर झाल ते आश्चर्यच! देशाच्या पंतप्रधानांनी मेलला उत्तर देत भेटीची वेळ दिली.

'तुम्ही राष्ट्रपती केव्हा होणार आहात?'

त्यानंतर विखे पाटील परिवार अनिषासह पंतप्रधान मोदींना भेटण्यास गेला. यावेळी अनिषा सोबत पंतप्रधान मोदींनी आजोबांच्या भूमिकेत येत तिच्याशी बातचीत केली. यावेळी अनिषाने मोदींना एक निरागस असा प्रश्न विचारला. तो प्रश्न होता, तुम्ही गुजराथचे का?, तुम्ही इथे बसता का?, हे तुमचे ऑफिस का? आणि शेवटी प्रश्न विचारला तो तुम्ही राष्ट्रपती केव्हा होणार आहात? या प्रश्नावर मोदींनी स्मित हास्य केले.

विखे कुटुंबाने पंतप्रधान मोदींचे आभार मानले

या भेटीत मोदींनी हसत-हसत तिच्या प्रश्नांची मिश्कीलपणे उत्तरे देत तिचे कौतुकही केले. तसेच, 'इथे खास तुझ्या भेटीला मी आलोय' असही पंतप्रधान यावेळी अनिषाला म्हणाले आहेत. यावेळी विखे कुटुंबाने फुलांचा बुके देऊन पंतप्रधान मोदींचे आभार मानले. दरम्यान, या भेटीचे फोटो चांगलेच व्हायरल झाले, असून माध्यमांनीही या भेटीची चांगलीच दखल घेतली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.