ETV Bharat / state

...तर मुख्यमंत्र्यांना दालनात कोंडू, तृप्ती देसाईंचा इशारा - इंदोरीकर महाराज

इंदोरीकर महाराज वेळोवेळी महिलांचा आपल्या कीर्तनातून अपमान करतात. याशिवाय त्यांच्या समर्थकांनी माझ्यावर खालच्या पातळीवर समाजमाध्यमात, फोनवर टीका-टिप्पणी केली आहे. यासाठी त्यांच्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी केली.

desai
...तर मुख्यमंत्र्यांना दालनात कोंडू, तृप्ती देसाईंचा इशारा
author img

By

Published : Feb 18, 2020, 7:30 PM IST

Updated : Feb 18, 2020, 9:15 PM IST

अहमदनगर - इंदोरीकर महाराजांवर कारवाई न झाल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्या दालनात कोंडून अधिवेशनात गोंधळ घालू, असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी दिला. इंदोरीकरांवर तातडीने गुन्हा दाखल करा, अशी मागणी त्यांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्याकडे केली.

...तर मुख्यमंत्र्यांना दालनात कोंडू, तृप्ती देसाईंचा इशारा

इंदोरीकर महाराज वेळोवेळी महिलांचा आपल्या कीर्तनातून अपमान करतात. याशिवाय त्यांच्या समर्थकांनी माझ्यावर खालच्या पातळीवर समाजमाध्यमात, फोनवर टीका-टिप्पणी केली आहे. यासाठीही त्यांच्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देसाई यांनी केली. पीसीपीएनडीटी कायद्यानुसार लवकर कारवाई केली नाही, तर इंदोरीकर यांना अकोलेत जाऊन काळे फासू, असा इशाराही त्यांनी दिला.

हेही वाचा - अखेर.. इंदोरीकर महाराज यांचा माफीनामा; म्हणाले...

पुण्याहून भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांसह देसाई मोठ्या पोलीस बंदोबस्तात नगरला आल्या होत्या. हिंदू राष्ट्र सेनेच्या स्मिता अष्टेकर यांच्यासह काही संघटनांनी त्यांना नगरमध्ये आल्यास जोरदार प्रतिउत्तर दिले जाईल, असा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारी घेत देसाई यांना संरक्षण दिले होते.

Last Updated : Feb 18, 2020, 9:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.