ETV Bharat / state

साई देवस्थान प्रकरण: तृप्ती देसाईंची ४ तासांनी सुटका, म्हणाल्या-पुन्हा शिर्डीला येणार - trupti desai on shirdi temple

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना 11 तारखेपर्यंत शिर्डीत येण्यास प्रशासनाने बंदी घातली होती. मात्र स्वत:च्या निर्णयावर ठाम राहत त्यांनी शिर्डीकडे कूच केले. यानंतर अहमदनगर पोलीस प्रशासनाने त्यांना सुपे हद्दीत ताब्यात घेतले. देसाई यांच्यासोबत असणारे कार्यकर्ते देखील पोलिसांच्या ताब्यात आहेत.

trupti desai in shirdi
साई देवस्थान प्रकरण : तृप्ती देसाई सुपे पोलिसांच्या ताब्यात, शिर्डीत पोहोचण्याआधीच कारवाई
author img

By

Published : Dec 10, 2020, 3:49 PM IST

Updated : Dec 10, 2020, 6:18 PM IST

अहमदनगर - साईबाबा देवस्थान परिसरातील पोषाखासंबंधी फलक हटवण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आज सकाळी साडेआठ वाजता शिर्डीसाठी रवाना झाल्या. त्यांना 11 तारखेपर्यंत शिर्डीत येण्यास प्रशासनाने बंदी घातली होती. मात्र स्वत:च्या निर्णयावर ठाम राहात त्यांनी शिर्डीकडे कूच केले. यानंतर अहमदनगर पोलीस प्रशासनाने त्यांना सुपे हद्दीत ताब्यात घेतले. देसाई यांच्यासोबत असणाऱ्या कार्यकत्यांना देखील ताब्यात घेण्यात आले. सुमारे ४ तासांनी तृप्ती देसाई यांची सुटका करण्यात आली. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा शिर्डीला येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, तृप्ती देसाई यांना अटक केल्यानंतर जल्लोष करणाऱ्या ४० जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सुपा टोल नाक्यावर त्यांची चारचाकी अडवून ही कारवाई करण्यात आली. यावेळी देसाई यांनी मास्क न घातल्याचे दिसून आले. आपण शिर्डी सीमेवर थांबण्यास तयार आहोत. मात्र सोबतच्या कार्यकर्त्यांना पुढे जाऊ द्यावे, अशी मागणी देसाई यांनी केली. अद्याप त्यावर बोलणी सुरू आहेत. पोलिसांनी अडवल्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तिथेच घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे.

साई देवस्थान प्रकरण : तृप्ती देसाई सुपे पोलिसांच्या ताब्यात, शिर्डीत पोहोचण्याआधीच कारवाई

शिर्डीतील फलक अभिव्यक्ती स्वातंत्र्याविरोधात

शिर्डी संस्थानने लावलेला फलक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधातील आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचे सोडून आम्हाला नोटीस दिली जाते, असे देसाईंचे म्हणणे आहे. संविधानाने आंदोलन करण्याचा अधिकार आम्हाला दिला आहे. त्यामुळे आम्ही शिर्डीत जाणारच, असे त्यांनी ठणकावले.

ब्राह्मण महासंघ शिर्डीत 'तैनात'

शिर्डीत येऊन संस्थानने लावलेले फलक काढणारच अशी भूमिका भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी घेतल्याने त्यांना विरोध करण्यासाठी ब्राह्मण महासंघाच्या महिला शिर्डीत दाखल झाल्या असून तृप्ती देसाई यांनी फलक काढण्याचे धाडस करू नये, असा दम त्यांनी दिला आहे. शिर्डीत आल्यास आम्ही त्यांना फलकापर्यंत पोहोचू देणार नाही आणि त्या येऊ शकल्या नाहीत, तर आम्ही जल्लोष साजरा करणार, असे ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे म्हणाले. आता ब्राम्हण महासंघाचे कार्यकर्ते शिर्डीत एकत्र जमले असून साई मंदिराला एक फेरी मारणार आहेत.

शिर्डी संस्थानने लावलेला फलक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधातील आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचे सोडून आम्हाला नोटीस दिली जाते, असे देसाईंचे म्हणणे आहे.

काय आहे प्रकरण?

साईबाबांच्या दर्शनासाठी येताना भाविकांनी भारतीय पेहराव करण्याचे आवाहन साई संस्थानाने केले. यासंबंधी मंदिराच्या आवारात फलक लावण्यात आले होते. या आवाहनाला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असताना भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी यावर आक्षेप घेत शिर्डीत येऊन फलक काढण्याचा इशारा दिला. यावर शिर्डीतील महिला आक्रमक झाल्या असून त्यांनी तृप्ती देसाईंना उत्तर देण्याचा चंग बांधला. स्थानिक शिवसेनेच्या महिला देखील आक्रमक होत त्यांनी देसाई यांना धमकीवजा इशारा दिला.

..अखेर शासकीय नोटीस

भक्तांना पारंपारिक पोषाखात येण्याचे आवाहन शिर्डी देवस्थानाने केले होते. यावर आक्षेप घेत ते फलक हटवण्याची मागणी महिला कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केली होती. आता देसाई यांना 8 ते 11 डिसेंबर दरम्यान शिर्डीत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तृप्ती देसाई यांनी 10 डिसेंबरला शिर्डीत येऊन फलक हटवण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर संबंधित निर्णय घेण्यात आला आहे. शिर्डीचे विभागीय दंडाधिकारी गोविंद शिंदे यांनी देसाई यांच्या प्रवेशबंदी संदर्भात नोटीस दिली आहे. ही नोटीस घेऊन संबंधित अधिकारी तृप्ती देसाई यांच्या घरी दाखल झाले.

स्वत:च्या निर्णयावर ठाम राहत तृप्ती देसाईंनी शिर्डीकडे कूच केले.

शिवसेना महिला आघाडी आक्रमक

शिवसेना महिला आघाडीच्या शिर्डीतील कार्यकर्त्यांनी साई संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांचे या निर्णयाबद्दल आभार मानले. पेहराव्याबाबत संस्थानने विनंती केलेली आहे, सक्ती केलेली नाही या मुद्द्याकडे लक्ष वेधत शिवसेना महिला आघाडीने महिलांवर जेव्हा अत्याचार होतात, तेव्हा या तृप्ती देसाई कुठे असतात, असा सवाल उपस्थित केला.तृप्ती देसाईंनी दर्शनासाठी यावे, आम्ही त्यांचे स्वागत करू. मात्र, फलक काढण्याची स्टंटबाजी केली तर सेना स्टाईलने त्यांच्या तोंडाला काळे फासू,असा इशारा शिवसेनेच्या महिला तालुका संघटक स्वाती परदेशी यांनी दिला आहे.

Last Updated : Dec 10, 2020, 6:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.