ETV Bharat / state

तृप्ती देसाईंना 8 ते 11 डिसेंबरपर्यंत शिर्डीत प्रवेशबंदी - तृप्ती देसाई बातम्या

भक्तांना भारतीय पारंपारिक पोषाखात येण्याचे आवाहन शिर्डी देवस्थानाने केले होते. यावर आक्षेप घेत ते फलक हटवण्याची मागणी महिला कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केली होती. आता देसाई यांना 8 ते 11 डिसेंबर दरम्यान शिर्डीत प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

trupti desai on saibaba temple
8 डिसेंबर ते 11 डिसेंबरपर्यंत तृप्ती देसाईंना शिर्डीत प्रवेशबंदी
author img

By

Published : Dec 8, 2020, 8:24 PM IST

Updated : Dec 8, 2020, 8:45 PM IST

अहमदनगर - साईबाबा संस्थानच्यावतीने मंदिर परिसरात भारतीय पोषाखात येण्यासंबंधी फलक लावण्यात आले आहेत. यामध्ये भक्तांना पारंपारिक पोषाखात येण्याचे आवाहन शिर्डी देवस्थानाने केले होते. यावर आक्षेप घेत ते फलक हटवण्याची मागणी महिला कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केली होती. आता देसाई यांना 8 ते 11 डिसेंबर दरम्यान शिर्डीत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तृप्ती देसाई यांनी 10 डिसेंबरला शिर्डीत येऊन फलक हटवण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर संबंधित निर्णय घेण्यात आला आहे.

नोटीस घेऊन संबंधित अधिकारी तृप्ती देसाई यांच्या घरी दाखल झाले.

शिर्डीचे विभागीय दंडाधिकारी गोविंद शिंदे यांनी देसाई यांच्या प्रवेशबंदी संदर्भात नोटीस दिली आहे. ही नोटीस घेऊन संबंधित अधिकारी तृप्ती देसाई यांच्या घरी दाखल झाले. आता देसाई पुढे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

trupti desai on saibaba temple
देसाई यांना 8 ते 11 डिसेंबर दरम्यान शिर्डीत प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

साईबाबांच्या दर्शनासाठी येताना भाविकांनी भारतीय पेहराव करण्याचे आवाहन साई संस्थानाने केले. यासंबंधी मंदिराच्या आवारात फलक लावण्यात आले होते. या आवाहनाला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असताना भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी यावर आक्षेप घेत शिर्डीत येऊन फलक काढण्याचा इशारा दिला. यावर शिर्डीतील महिलाही आक्रमक झाल्या असून त्यांनी तृप्ती देसाईंना उत्तर देण्याचा चंग बांधला. स्थानिक शिवसेनेच्या महिला देखील आक्रमक होत त्यांनी देसाई यांना धमकीवजा इशारा दिला.

शिवसेना महिला आघाडी आक्रमक

शिवसेना महिला आघाडीच्या शिर्डीतील कार्यकर्त्यांनी साई संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांचे या निर्णयाबद्दल आभार मानले. पेहराव्याबाबत संस्थानने विनंती केलेली आहे, सक्ती केलेली नाही या मुद्द्याकडे लक्ष वेधत शिवसेना महिला आघाडीने महिलांवर जेव्हा अत्याचार होतात, तेव्हा या तृप्ती देसाई कुठे असतात, असा सवाल उपस्थित केला.

तृप्ती देसाईंनी दर्शनासाठी यावे, आम्ही त्यांचे स्वागत करू. मात्र, फलक काढण्याची स्टंटबाजी केली तर सेना स्टाईलने त्यांच्या तोंडाला काळे फासू,असा इशारा शिवसेनेच्या महिला तालुका संघटक स्वाती परदेशी यांनी दिला आहे.

Last Updated : Dec 8, 2020, 8:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.