अहमदनगर - अरणगाव-सोलापूर बायपासजवळ आगपेटीने भरलेल्या ट्रकला आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे बायपास रोडवर वाहतुकीची कोंडी झाली आहे. घटनास्थळी आग्निशमनचे दोन बंब त्वरित दाखल झाले असून त्यांनी आगीवर नियत्रंण मिळवले आहे.
आगपेटीने भरलेला ट्रक सोलापूरहून अरणगावकडे येत होता. यावेळी चालत्या ट्रकने पेट घेतला. चालकाने आणि क्लीनरने प्रसंगावधान साधून गाडीच्या बाहेर उडी मारल्याने ते बचावले आहेत.