ETV Bharat / state

रणगाडाभेदी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; अर्जुन रणगाड्यातून भेदक मारा - युद्ध सराव भूमी केके रेंज

लेझरच्या मदतीने निश्चित केलेल्या लक्ष्याचा अचूक भेद करणाऱ्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी गुरुवारी अहमदनगर येथील युद्ध सरावभूमी, केके रेंज येथे करण्यात आली.

author img

By

Published : Oct 2, 2020, 11:58 AM IST

अहमदनगर - लेझरच्या मदतीने निश्चित केलेल्या लक्ष्याचा अचूक भेद करणाऱ्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी गुरुवारी अहमदनगर येथील युद्ध सरावभूमी, केके रेंज येथे करण्यात आली. अर्जुन रणगाड्यातून ही चाचणी करण्यात आली आहे. डीआरडीओच्या पुण्यातील प्रयोगशाळेमध्ये या क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आलेली आहे.

डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या पुण्यातील 'आर्ममेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट कमेटी आणि एनर्जी मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी' (एचआरएलएचएमआरएल) प्रयोगशाळांमध्ये हे लेझर गाईड क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले आहे. क्षेपणास्त्राची रचना त्यासाठी आवश्यक असणारे तंत्रज्ञान विकसित करणे तसेच, क्षेपणास्त्र डागण्यासाठी आवश्यक असलेली लॉन्चिंग यंत्रणा या संस्थेत निर्माण केली आहे. या क्षेपणास्त्रात आवश्यक असणारा दारुगोळा त्याचबरोबर अनेक तांत्रिक गोष्टींची निर्मिती एचएमआरएल या प्रयोगशाळेत केली आहे.

कमी अंतरावरील रणगाडा भेदण्यासाठीची यशस्वी चाचणी 22 सप्टेंबर रोजी करण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी, 1 ऑक्टोबर रोजी लांब अंतरावरील शत्रूचा रणगाडा भेदण्याची चाचणी घेण्यात आली, ती यशस्वी झाल्याचे लष्करातर्फे सांगण्यात आले आहे.

लेझर गायडेड रणगाडाभेदी क्षेपणास्त्रच्या मदतीने दीड किलोमीटरपासून पाच किलोमीटर अंतरावरील शत्रूच्या लक्ष्याचा अचूक वेध घेता येतो. अर्जुन रणगाड्याच्या 120 एमएम तोफेतून हे क्षेपणास्त्र डागता येणार आहे. तसेच हे क्षेपणास्त्र वेगवेगळ्या वाहनातून लक्ष्यावर हल्ला करण्यासाठी सक्षम आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.