ETV Bharat / state

Ahmednagar Division: अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, संगमनेर आणि शिर्डी ही तीन नावे नव्या जिल्हा मुख्यालयासाठी आघाडीवर

आजवर अनेकदा अहमदनगर जिल्हा विभाजनाच्या मागणीसाठी जनतेने आंदोलने केली. जिल्हाचे मुख्यालय कुठे व्हावे या मुद्यावरून मतभिन्नता आहे. श्रीरामपूर, संगमनेर आणि शिर्डी ही तीन नावे नव्या जिल्हा मुख्यालयासाठी आघाडीवर आहेत. आजवर या अनेकदा मागणी आणि आंदोलने होऊन देखील जिल्हा विभाजन प्रत्यक्षात आले नाही. प्रशासकीय खर्चाचा मोठा अर्थिक बोजा हे त्यामागचे एक प्रमुख कारण आहे.

Ahmednagar Division
अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजन
author img

By

Published : May 5, 2023, 8:24 PM IST

अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनावर पत्रकाराची प्रतिक्रिया

अहमदनगर: लोकसंख्या आणि क्षेत्रफळाने सर्वांत मोठा जिल्हा असलेल्या अहमदनगर जिल्हाचे विभाजन व्हावे ही फार वर्षांपासूनची मागणी आहे. तेरा तालुक्यांचा समावेश असलेल्या या अहमदनगर जिल्ह्याचा कारभार पाहणे, हे प्रशासनाच्या दृष्टीने देखील जिकरीचे होते. जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकारी यांना मोठी कसरत करावी लागते.

जिल्हा विभाजनाच्या केवळ घोषणाच: भौगोलिकदृष्ट्या विचार करून शिर्डी हे जिल्ह्याचे मुख्यालय असावे, असा प्रस्ताव प्रशासनाने यापूर्वीच राज्य सरकारकडे पाठविला. हा प्रस्ताव धुळखात पडून आहे. भाजप शिवसेना युतीचे सरकार सत्तेत असताना तत्कालीन पालकमंत्री राम शिंदे यांनी अहमदनगर जिल्हा विभाजनाच्या वारंवार घोषणा केल्या. त्या हवेत विरल्या होत्या. भौगोलिकदृष्ट्या शिर्डी हे उत्तर नगर जिल्ह्यातील जनतेच्या दृष्टीने मध्यवर्ती आहे. विमानतळ, रेल्वेमार्ग, समृध्दी महामार्ग आणि नव्या मुख्यालयाकरिता लागणारी जमीन शिर्डीत येथे उपलब्ध आहे. त्यामुळे शिर्डी हे जिल्ह्याच्या मुख्यालय व्हावे असा, प्रस्ताव सरकार दरबारी पाठवण्यात आलेला आहे.

नाम बदलाचे वारे जोरात: महाराष्ट्रामध्ये असलेल्या जिल्ह्यांपैकी औरंगाबाद उस्मानाबाद आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांची नावे तसेच सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर तालुक्याचे नाव मुस्लिम आहेत. या तीनही जिल्ह्यांची नावे बदलण्याची मागणी गेले कित्येक वर्षे केली जात आहे. यानुसार औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली होती ही नावे बदलण्यास केंद्र सरकारने ही मंजुरी दिली असल्याने या दोन्ही जिल्ह्यांची नावे आता बदलण्यात आली आहे.

इस्लामपूर नामांतराची मागणी: औरंगाबाद, उस्मानाबाद जिल्ह्याप्रमाणे अहमदनगर या जिल्ह्याचे तसेच इस्लामपूर तालुक्याचे नाव बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवसेनेकडून अहमदनगरचे नाव अंबिका नगर, हिंदू राष्ट्र सेनेकडून श्रीराम नगर करण्याचे तर आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहिल्याबाई होळकर नगर असे नामांतर करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. तर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर या तालुक्याचे नाव ईश्वर करावे अशी मागणी शिवसेनेने केली आहे. संभाजी भिडे यांच्या शिव प्रतिष्ठान या संघटनेने सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देवून इस्लामपूर नाव ईश्वरपुर करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा: Sharad Pawar Resignation Withdraw : शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा घेतला मागे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.