ETV Bharat / state

Shirdi News : साई संस्थानच्या 'त्या' कर्मचाऱ्यविरोधात अखेर गुन्हा दाखल; ई टीव्ही भारतच्या बातमीचा परिणाम - Sai Institute employee Dashrath Chaskar

Shirdi News : साईबाबा संस्थानच्या देणगी कार्यालयात देणगी दिलेल्या भाविकाला एकाच नंबरच्या दोन पावत्या दिल्याची बातमी ई टीव्ही भारतनं प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेत साई संस्थानकडून कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

ETV Bharat Impact
ETV Bharat Impact
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 1, 2023, 12:25 PM IST

सोपान शिरसाठ, पोलीस निरीक्षक, शिर्डी

शिर्डी Shirdi News : साईबाबांच्या दर्शनानंतर मंदिर परिसरातील साई संस्थानच्या देणगी काउंटरवर एक भाविक देणगी देण्यासाठी गेला. त्या भाविकानं आपल्या श्रद्धेनुसार देणगीही दिली. त्या भाविकाला देणगी काउंटरवरील कर्मचाऱ्यानं देणगीची एक पावती न देता थेट दोन एकाच नंबरच्या पावत्या दिल्या. हे भाविकाच्या लक्षात आल्यानं त्या भाविकानं साई संस्थानकडे तक्रार केली. भाविकाच्या तक्रारीनंतर साई संस्थानच्या अधिकाऱ्यांनी देणगी कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांना कारण दाखवत तातडीनं दुसऱ्या ठिकाणी बदल्याही केल्या. मात्र, त्यांची बदली करून काहीच होणार नाही. या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिर्डीतील जागरुक नागरिकांनी ई टीव्ही भारतच्या माध्यमातून केली होती. ई टीव्ही भारतवर साई संस्थाननं या प्रकरणाची चौकशी करून अखेर आज देणगी कार्यालयातील एका कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केलाय. दशरथ चासकर असं गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्याच नाव आहे.

निनावी अर्जानं प्रकरण उघडकीस : शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी वर्षाकाठी कोट्यवधी भक्त शिर्डीला येतात. यातील बहुतांशी भक्त साई मंदिर परीसरातील साई संस्थानच्या देणगी कार्यालयात देणगी देतात. मात्र या ठिकाणी देणगी स्विकारण्यासाठी बसलेल्या कर्मचाऱ्याकडून देणगीच्या रकमेत अफरातफर करत साईभक्तांची आणि साई संस्थानची फसवणूक केली जात असल्याचं साई संस्थानचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधिश सुधाकर यर्लीगड्डा यांना आलेल्या एका निनावी अर्जानंतर उघड झालय.

शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : साईबाबा मंदीर परीसरातील देणगी कार्यालयात देणगी दिल्यानंतर देणगीची संगणकीय प्रिट दिली जाते. ही प्रिट देताना संस्थानचा कंत्राटी कर्मचारी असलेल्या दशरथ चासकरनं भक्तानं दिलेल्या दानाच्या रक्कमेच्या दोन पावत्या करत त्यातील एकाच पावतीच्या रकमेची नोंद साई संस्थानकडे केल्याचं साई संस्थानच्या लेखा शाखेनं केलेल्या चौकशीतून आणि एका साईभक्तानं केलेल्या तक्रारीतून समोर आलय.

पोलिसांकडून अधिक तपास सुरू- दशरथ चासकरनं भक्ताला पावती देतांना त्या पावतीला विशीष्ट शाई वापरत खाडाखोड केल्याच उघड झाल्यावर साई संस्थानचे लेखाधीकारी कैलास खराडे यांच्या फिर्यादी वरुन दशरथ चासकर यांच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. साई संस्थानच्या कर्मचाऱ्यानं भक्तानं दिलेल्या दानाच्या अर्ध्या रकमेची खरी पावती व अर्ध्या रकमेची खोटी पावती देवून फसवणूक करत असल्याचं समोर आल्यानं मोठी खळबळ उडालीय. साई संस्थानकडून केलल्या तक्रारीत बारा हजारांची अफरातफर असल्याचं सांगण्यात आलंय. मात्र, ही रक्कम या पेक्षा अधिक असल्याची चर्चा शिर्डीत सुरू आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा :

  1. Shirdi Saibaba Trust Donation Problem : भाविकाला दिल्या एकाच नंबरच्या दोन पावत्या, साईभक्तांची फसवणूक
  2. Shirdi Triple Murder : तिहेरी हत्याकांडानं शिर्डी हादरलं; जावयाकडून मेव्हण्यासह पत्नी, आजी सासूची हत्या
  3. D Y Chandrachud Shirdi : 'साईंची शिकवण संपूर्ण मानव समाजासाठी मार्गदर्शक'; सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड साईचरणी नतमस्तक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.