ETV Bharat / state

कोरोना इफेक्ट; साईबाबांचे मंदिर अनिश्चित काळासाठी बंद... - corona effect in shirdi

दुपारी तीननंतर मंदिराचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले आहेत.

corona in shirdi
साईबाबांचे मंदिर अनिश्चित काळासाठी बंद...
author img

By

Published : Mar 17, 2020, 5:34 PM IST

Updated : Mar 17, 2020, 6:12 PM IST

शिर्डी - वाढत्या कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी आता शिर्डीचे साईबाबा मंदिरही अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे. दुपारी तीननंतर मंदिराचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले आहेत. साईबाबा संस्थानमार्फत चालवण्यात येणारे प्रसादालय आणि भक्त निवासही उद्यापासुन बंद करण्यात येणार आहेत.

साईबाबांचे मंदिर अनिश्चित काळासाठी बंद...

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार लक्षात घेता गर्दीच्या ठिकाणावरील गर्दी आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने आदेश दिले होते. यानंतर शिर्डीच्या साईबाबा संस्थाननेही साई मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेत आज दुपारी तीन वाजेपर्यंत दर्शन देण्यात आले. त्यानंतर मंदिरात जाणारे सर्व दरवाजे बंद करण्यात आले आहेत. मंदिर परीसरातुनही सर्व भाविकांना बाहेर काढण्यात आले आहे.

दुपारी तीनपर्यंत अनेकांनी दर्शन घेतले आहे. तर, अनेकांचे दर्शन घेणे बाकी राहिले आहे. काहींनी तर आम्ही बाबांच्या नगरीत आलो त्यातच समाधान झाल्याचे म्हटले आहे. साई मंदिरातील चारही आरत्यांसाठी केवळ पुजारीच उपस्थित असणार आहेत. साई मंदिरासह द्वारकामाई, चावडी, मारुती मंदिरही भक्तांच्या दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. येत्या गुरुवारी रात्री द्वारकामाईतून निघणाऱया साईबाबांच्या पालखी सोहळ्यातही केवळ पुजारीच उपस्थित राहणार आहेत.

Last Updated : Mar 17, 2020, 6:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.