ETV Bharat / state

'बारामती अॅग्रो'चे ८० टँकर राम शिंदेंच्या कर्जत-जामखेड मतदातसंघात - रोहित पवार

यावेळी बोलताना पवार म्हणाले, सध्या परिसरात भयानक दुष्काळी परिस्थिती आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. शहरात पाण्यावरून दंगली होत आहेत. बारामती अँग्रोतर्फे कर्जत जामखेड तालुक्यात ८० टॅकर सुरू आहेत.

रोहित पवार
author img

By

Published : May 12, 2019, 10:53 AM IST

Updated : May 12, 2019, 2:52 PM IST

अहमदनगर- दुष्काळी परिस्थितीत नेहमीच होरपळणाऱ्या जामखेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भुतवडा तलावातील गाळ काढण्याचे काम दोन दिवसात सुरू करू, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. तीन दिवसांपूर्वीच शहरात पाण्यासाठी दोन गटात प्रचंड हाणामारी होऊन परस्परांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी जामखेड तालुक्यातील जवळा, राजेवाडी, खांडवी, भुतवडा तलाव, हापटेवाडी, पाटोदा व जामखेड येथे भेट देत कार्यकर्ता संवाद मेळाव्यात मार्गदर्शन केले.

यासोबतच पाण्याची अडचण असणार्‍या ठिकाणी सामाजिक हेतू समोर ठेवून बारामती अॅग्रोतर्फे टँकर सुरू करू आणि लोकांना टंचाईच्या काळात दिलासा देऊ, असे रोहित पवार यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काकासाहेब तापकीर, राजेंद्र कोठारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

रोहित पवारांचा जामखेड दौरा

मतदान संपताच काहींचे टँकर बंद - रोहित पवार

यावेळी बोलताना पवार म्हणाले, सध्या परिसरात भयानक दुष्काळी परिस्थिती आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. शहरात पाण्यावरून दंगली होत आहेत. बारामती अॅग्रोतर्फे कर्जत जामखेड तालुक्यात ८० टॅकर सुरू आहेत. जिथे गरज असेल तिथे नवीन टँकर सुरू करू, काल दंगल झालेल्या ठिकाणी नवीन दोन टँकर सुरू करू, असेही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या काळात काही नेत्यांनी टॅकर सुरू केले होते आणि मतदानानंतर सर्व टँकर बंद केले. हे फक्त दाखवण्यापुरतेच होते, हे योग्य नाही, अशी टीका त्यांनी विखे यांचे नाव न घेता केली.

छावण्यात राजकारण आणि निकृष्ट चारा-

यावेळी रोहित पवार यांनी मतदारसंघातील एकूणच चारा छावण्यांबाबत नाराजी व्यक्त केली. अनेक छावण्या ह्या पालकमंत्री शिंदे यांच्या कार्यकर्त्यांच्याच आहेत. अशात छावण्यांत निकृष्ट दर्जाचे खुराक आणि कमी प्रमाणात चारा पुरविला जातो, असा आरोप पवार यांनी केला.

Intro:अहमदनगर- 'बारामती ऍग्रो'चे 80 टँकर राम शिंदेंच्या कर्जत-जामखेड मतदातसंघात. रोहित पवारांनी केला दुष्काळी पाहणी दौरा..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_12_may_ahm_trimukhe_1_rohit_pawar_drought_visit_v

अहमदनगर- 'बारामती ऍग्रो'चे 80 टँकर राम शिंदेंच्या कर्जत-जामखेड मतदातसंघात. रोहित पवारांनी केला दुष्काळी पाहणी दौरा..

अहमदनगर- दुष्काळी परिस्थितीत नेहमीच होरपळणाऱ्या जामखेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भुतवडा तलावातील गाळ काढण्याचे काम दोन दिवसात सुरू करू तसेच पाण्याची अडचण असणार्‍या ठिकाणी सामाजिक हेतू समोर ठेवून बारामती अॅग्रोतर्फे टॅकर सुरू करू व लोकांना टंचाईच्या काळात दिलासा देऊ असे रोहित पवार यांनी सांगितले. तीन दिवसांपूर्वीच शहरात पाण्यासाठी दोन गटात प्रचंड हाणामारी होऊन परस्परांवर गुन्हे दाखल झाल्याने पाण्याची परस्थिती गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी जामखेड तालुक्यातील जवळा, राजेवाडी, खांडवी, भुतवडा तलाव भेट, हापटेवाडी, पाटोदा व जामखेड येथे भेट देत कार्यकर्ता संवाद मेळाव्यात मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काकासाहेब तापकीर, राजेंद्र कोठारी, प्रा. मधुकर राळेभात, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे, शरद भोरे, सुरेश भोसले, शरद भोरे, संजय वराट, हनुमंत पाटील, राजेंद्र पवार, शरद शिंदे, शहाजीराजे भोसले, राहुल उगले डॉ. कैलास हजारे, गजानन फुटाणे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मतदान संपताच काहींचे टँकर बंद..-रोहित पवार
-यावेळी बोलताना पवार म्हणाले की, सध्या परिसरात भयानक दुष्काळी परिस्थिती आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. शहरात पाण्यावरून दंगली होत आहेत. योग्य नियोजन नसल्याने हे घडत आहे. बारामती अँग्रोतर्फे कर्जत जामखेड तालुक्यात ८० टॅकर सुरू आहेत. जेथे गरज असेल तेथे नवीन टॅकर सुरू करू काल दंगल झालेल्या ठिकाणी नवीन दोन टॅकर सुरू करू तसेच आम्ही सामाजिक हेतू समोर ठेवून टॅकर सुरू केलेले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या काळात काही नेत्यांनी टॅकर सुरू केले होते व मतदानाच्या दिवशी सर्व टॅकर बंद केले हे फक्त दाखवण्यापुरते होते हे योग्य नाही असे विखे यांचे नाव न घेता टिका केली. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भुतवडा तलावातील गाळ काढण्याचे काम दोन दिवसात सुरू करू आम्ही मशिन पुरवू शेतकऱ्यांना त्यांच्या वाहनात भरून देऊ शेतकऱ्याची फक्त वाहतूक खर्च करावयाचा आहे. गाळ निघाला तर पाणीसाठा वाढेल.

छावण्यात राजकारण आणि निकृष्ट चारा-
-यावेळी रोहित पवार यांनी मतदारसंघातील एकूणच चारा छावण्या बाबत नाराजी व्यक्त केली. आम्ही टँकर सुरू केल्यावर आता काहींना जाग आली आहे, श्रेयवाद घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका पवार यांनी यावेळी केली. अनेक छावण्या ह्या पालकमंत्री शिंदे यांच्या कार्यकर्त्यांच्याच आहेत. अनेक छावण्यात निकृष्ट दर्जाचे खुराक व कमी प्रमाणात चारा पुरविला जातो. अनेक ठिकाणी तर कुट्टीपण दिली जात नाही. पंधरा किलोच चारा दिला जातो. बिल्ले मारण्याचे आदेश दिले आहेत. बिल्ले पुरवठादार खाजगी ठेकेदार असणार आहे. यात सावळा गोंधळ आहे.
तसेच पाण्याचा टॅकर मध्ये मोठ्या प्रमाणावर सावळा गोंधळ आहे. प्रत्यक्षात कमी खेपा पण कागदावर जास्त खेपा दाखविल्या जातात त्यामुळे लोकांना वेळेवर पाणी मिळत नाही, असा आरोप पवार यांनी केलाय.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- 'बारामती ऍग्रो'चे 80 टँकर राम शिंदेंच्या कर्जत-जामखेड मतदातसंघात. रोहित पवारांनी केला दुष्काळी पाहणी दौरा..
Last Updated : May 12, 2019, 2:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.