ETV Bharat / state

देवदेवतांची सोंगे घेत साजरा होतो कोल्हार येथील विरभद्र देवाचा यात्रोत्सव

जिल्ह्यातील कोल्हार गावात विरभद्र देवाचा यात्रोत्सव साजरा केला जातो. या यात्रेमध्ये देवदेवतांची सोंगे यात्रेकरूंचे आकर्षण ठरत आहेत.

देवदेवतांची सोंगे घेतलेले ग्रामस्थ
author img

By

Published : Apr 7, 2019, 6:42 PM IST

अहमदनगर - मराठी नववर्ष सुरू झाले, की ग्रामीण भागात यात्रा आणि जत्रांना सुरूवात होते. जिल्ह्यातील कोल्हार गावात विरभद्र देवाचा यात्रोत्सव साजरा केला जातो. या यात्रेमध्ये देवदेवतांची सोंगे यात्रेकरूंचे आकर्षण ठरत आहेत. राहुरी तालुक्यातील कोल्हार गाव पुर्वापार चालत आलेली ही सोंगांची प्रथा जपत आहे.

देवदेवतांची सोंगे घेतलेले ग्रामस्थ

पुर्वीच्या काळी पौराणीक कथा सोंगाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवल्या जात होत्या. कदाचित करमणुकीची साधने कमी असल्यामुळे ते सोंगे करत असतील. परंतु, तीच परंपरा आजही कोल्हार गाव जपत आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी गावाचे आराध्य दैवत असलेल्या विरभद्र देवाची यात्रा भरते. या यात्रेत देवदेवतांची सोंगे नाचवली जातात. रामायण, महाभारतातील कथा देवदेवीच्या सोंगाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवल्या जातात.

आजही गावातील लोक सोंगे नाचवण्याची परंपरा जपतात. सनई आणी संबळ या पारंपरिक वाद्यांवर नाचणारी देवांची सोंगे पाहण्यासाठी गावातील सर्व लोक येतात. कला आणि मनोरंजनाच्या माध्यमातून धार्मिक संस्कृती जपताना महाराष्ट्रात अनेक खेडी पहायला मिळतात.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_मराठी नववर्ष सुरू झाले की ग्रामीण भागात यात्रा जत्रा सुरू होतात..अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार गावात देवदेवतांच्या सोंगाची आखाडी लोकांचे आकर्षण ठरतेय....

VO_ कदाचित पुर्वीच्या काळी कोणतेही करमणूकीचे साधन नव्हते म्हणून अनेक गावात पौराणीक कथा देवदेवतांच्या सोंगाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवल्या जात होत्या..तीच परंपरा आजही राहुरी तालुक्यातील हे कोल्हार गाव जपत आहे .. गुढीपाडव्याच्या दिवशी गावातील आराध्य दैवत विरभद्राची यात्रा भरते आणी याच रात्री देवदेवतांची सोंग नाचवली जातात.. रामायण, महाभारत यातील कथा देवदेवतांच्या सोंगाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवण्याचा हा प्रयत्न आहे ..कोल्हार गावातील अनेकांच्या घरात परंपरागत देवाचे सोंग नाचवण्याची प्रथा आहे आणी आजही हे लोक अने
पिढ्यांपासून आपल्याकडं असणार्या देवाच्या सोंगाला नाचवण्याची परंपरा जपताहेत.. सनई आणी संबळ या पारंपारिक वाद्यावर नाचणारे हे विविध देवांची सोंग बघण्यासाठी अनेक गावातील लोक येथे दाखल होतात..कला आणि मनोरंजनाच्या माध्यमातून धार्मिक संस्कृती जपताना आजही महाराष्ट्रात अनेक खेडी बघायला मिळतात...Body:7 April Shirdi Kolhar YatraConclusion:7 April Shirdi Kolhar Yatra
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.