ETV Bharat / state

स्थानिक प्रश्नांसाठी शिवसेना खासदारांना घ्यावी लागेल शिंदे सरकारची मदत : खासदार सदाशिव लोखंडे

शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे ( MP Sadashiv Lokhande ) हे दोन टर्मपासून शिवसेना पक्षाकडून शिर्डी लोकसभा क्षेत्रातून निवडून येत आहेत. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, मी शिवसेना भाजप-युतीचा उमेदवार ( Candidate of Shiv Sena-BJP Alliance ) म्हणून निवडून आलो आहे. उद्या मातोश्रीवर पक्षाची बैठक ( Tomorrow meeting on Matoshri )आहे. त्यावेळी आम्ही सर्व खासदार आपली भूमिका मांडणार आहोत

MP Sadashiv Lokhande
खासदार सदाशिव लोखंडे
author img

By

Published : Jul 10, 2022, 7:49 PM IST

Updated : Jul 10, 2022, 8:07 PM IST

शिर्डी (अहमदनगर) : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी ( After the revolt of Eknath Shinde ) केल्यानंतर शिवसेना पक्षाची गळती थांबताना दिसत नाही. आता आमदारांनंतर खासदारही वेगळी वाट धरत एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशातच शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे ( Shiv Sena MP Sadashiv Lokhande ) यांनी निवडणुकीत उमेदवार पक्षाचा असतो. मात्र, निवडून आल्यानंतर तो जनतेचा होतो. आपली भूमिका सोमवारी मातोश्रीवर होणा-या पक्षाच्या बैठकीत मांडू, असे म्हटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

खासदार सदाशिव लोखंडे

सदाशिव लोखंडे दोन टर्म शिर्डीचे खासदार : शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे हे दोन टर्मपासून शिवसेना पक्षाकडून शिर्डी लोकसभा क्षेत्रातून निवडून येत आहेत. जिल्ह्यात एकही शिवसेनेचा आमदार नसताना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत लोखंडे दोन लाख मताधिक्य घेत निवडून आले होते. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, मी शिवसेना भाजप-युतीचा उमेदवार म्हणून निवडून आलो आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आम्ही खासदारांनी त्यावेळीदेखील शिवसेना-भाजप युतीचा आग्रह धरला होता. मात्र, तेव्हा युती झाली नाही.

उद्या मातोश्रीवर बैठक : आता काल दिल्लीत काही खासदार होते. मात्र, मी शिर्डीत आहे. उद्या सोमवारी प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलवली आहे. त्यावेळी सर्व खासदार आपली भूमिका पक्षप्रमुखांसमोर स्पष्ट करतील. माध्यमांसमोर सांगण्यापेक्षा पक्षाच्या बैठकीत खासदार आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना जे सांगायचे ते उद्या मातोश्रीवरील बैठकीत सांगणार असल्याचे खा. लोखंडे यांनी म्हटले.

स्थानिक प्रश्नांसाठी शिंदे सरकारशी जुळवावे लागेल : अहमदनगर जिल्ह्यात निळवंडे धरणाच्या पाटपाण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. दरम्यान, जिल्ह्यात महाविकास आघाडी सरकारचे तीन मंत्री होते. त्यांनीदेखील याकडे लक्ष दिले नसल्याची टीका खा. लोखंडे यांनी केली. आता पुन्हा एकदा निळवंडे पाटपाणी कृती समितीने लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेतली आहे. मात्र, आता या प्रश्नाचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांना शिंदे सरकार दरबारी जुळवून घ्यावं लागणार, असे देखील म्हटले जात आहे.

खासदारही शिंदे गटात सामील होणार : आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर बंडखोर आमदारांची संख्या आता 50 वर पोहोचली आहे. यानंतर आता शिवसेनेचे काही खासदारही शिंदे गटात सामील होऊ शकतात, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. शिवसेनेचे 12 खासदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एका खासदाराचे नाव जाहीर करून शक्यतेला आधार दिला होता.

भावना गवळींनी केली विनंती : मुंबईतील खासदार राहुल शेवाळे यांच्या पाठोपाठ आता पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. तसेच, शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनीदेखील एकनाथ शिंदेंवर कारवाई न करण्याची विनंती केली होती. त्यामुळे त्या शिवसेनेचे खासदार एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

पश्चिमेचे पाणी गोदावरी खोऱ्यात : पश्चिमेचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून पाण्याची तूट भरून काढण्याची मागणी गेल्या अनेकवर्षांपासून होतेय स्वर्गीय बाळासाहेब विखे यांनीही ही मागणी शासन दरबारी मांडली होती. नगर जिल्ह्याच्या दृष्टीने हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आता राज्यात शिंदे सरकार असल्याने आणि त्यांनीही पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे वळविण्याचे ठरविल्याने आगामी लोकसभा निवडणुका पाहता खासदार निवडून पक्षाकडून येतो. मात्र, त्यानंतर तो जनतेचा होतो. या सदाशिव लोखंडेचा वक्तव्याचा अर्थ एकनाथ शिंदेंना पाठिंबा असल्याचे ठरतेय.

party chief Uddhav Thackeray in the meeting on Matoshri tomorrow

हेही वाचा : Aaditya Thackeray : 'माझ्यावर उगाच खास प्रेम करण्याची...'; अपात्रतेच्या नोटीसीवरुन आदित्य ठाकरेंचा शिंदे गटाला टोला

हेही वाचा : Vitthal Mahapuja By CM : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तीन पिढ्यांसोबत विठ्ठलाची शासकीय महापूजा, ... हे घातले साकडे

Last Updated : Jul 10, 2022, 8:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.