ETV Bharat / state

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मृदा जलसंधारणा मंत्री गडाखांचा मोठा निर्णय... - ahmednagar news

महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझे ते कर्तव्य आहे. याकरता मी आजपासून माझे सुरक्षेसाठी असलेले पोलीस कर्मचारी व ते वापरत असलेले पोलीस वाहन कोरोना व्हायरस प्रार्दुभाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनेत वापरण्यास आपणास याद्वारे परवानगी देत असल्याचेही त्यांनी पोलीस अधीक्षक यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.

minister shankarao gadakh dicision to return police security and vehicle due to corono effect
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मृद जलसंधारणा मंत्री गडाखांचा मोठा निर्णय..
author img

By

Published : Mar 25, 2020, 4:57 PM IST

अहमदनगर - मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी मंत्री आपल्या सुरक्षेसाठी असलेले पोलीस कर्मचारी व ते वापरत असलेले पोलीस वाहन सरकारी वापरासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी अहमदनगर पोलीस अधीक्षक यांना त्यांनी पत्र पाठवून तशी परवानगी दिली आहे.

minister shankarao gadakh dicision to return police security and vehicle due to corono effect
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मृद जलसंधारणा मंत्री गडाखांचा मोठा निर्णय..

मंत्री गडाख यांनी पत्रात लिहिले आहे, की देश आणि महाराष्ट्र कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात राष्ट्रहितासाठी संचारबंदी लागु केली आहे. याचे काटेकोरपणे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून आपल्या भागातील संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा आटोकाट प्रयत् करत आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेवर आलेला अधिकचा ताण पाहता मंत्री म्हणून माझ्या (Spotting) सुरक्षेसाठी असलेले पोलीस कर्मचारी व ते वापरत असलेले पोलीस वाहन आपण शहर व परिसरातील संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी वापरण्यास माझी काहीही हरकत नाही. आज रोजी माझ्या सुरक्षेपेक्षा देशाची तसेच महाराष्ट्राची व येथील जनतेची सुरक्षा महत्वाची आहे. महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझे ते कर्तव्य आहे. याकरता मी आजपासून माझे सुरक्षेसाठी असलेले पोलीस कर्मचारी व ते वापरत असलेले पोलीस वाहन कोरोना व्हायरस प्रार्दुभाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनेत वापरण्यास आपणास याद्वारे परवानगी देत असल्याचेही त्यांनी पोलीस अधीक्षक यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.