अहमदनगर: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज शिर्डी दौऱ्यावर आहेत. यावेळी ते भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सामील होती. यानंतर बूथ बैठक घेईल. तसेच बावनकुळे हे मोटारसायकल रॅलीसह सामाजिक बैठक भाग घेतील. ते 'धन्यवाद मोदीजी' या कार्यक्रमात देखील उपस्थिती लावणार आहेत. दरम्यान बावनकुळे यांनी शिर्डीत पत्रकार परिषद घेतली आहे. विरोधी पक्षाने एखाद्या विषयाला अनुसरून टीका केल्यास त्यावर आक्षेप घेतला जाणार नाही. आम्ही कुणावर व्यक्तिगत टीका करत नाही. जाणीवपूर्वक व्यक्तिगत टीका-टिप्पणी योग्य नाही. शरद पवार आणि अजित पवार सरकारवर टीका करीत असतात. तो त्यांचा अधिकार असल्याचे यावेळी बावनकुळे म्हणाले आहे.
यावर शंका वाटते: विश्वासघाताचे राजकारण उद्धव ठाकरेंकडून झाले असून भाजपात विश्वासघाती राजकारणाला अजिबात थारा नाही, असे विचार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नोंदविले. नेमक्या याच कारणामुळे भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येतील, याविषयी आपणास शंका वाटते, असेही यावेळी बावनकुळे म्हणाले आहे.
प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाचा अधिकार सर्वांना: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावरून सुरु असलेल्या चर्चेबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात बावनकुळे म्हणाले. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अनेकदा अयोध्येच्या दर्शनाला जात असतात. अयोध्येत भव्य राम मंदिर बनावे ही देशातील प्रत्येकाची इच्छा आहे. अयोध्येत श्रीरामांच्या दर्शनाला जाण्याचा अधिकार सर्वांचा असून त्यावर टीका करू नये. आगामी काही महिन्यात काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी देखील अयोध्येत रामाच्या दर्शनाला जाणार असल्याचे सूचक बावनकुळे यांनी व्यक्त केले.
विरोधकांनी सरकारपुढे प्रश्न मांडावे: निवडणूक लढवण्यासाठी कोणतीही डिग्री असण्याचा कायदा नाही. वस्तुस्थिती न स्वीकारता केवळ टीका केली जाते. तुम्ही विकास झाला पाहिजे यासाठी टीका करा. राज्यात आणि देशातील प्रश्नाबाबत आंदोलन करा. अनेक विषय सरकारपुढे विरोधकांनी मांडावेत; मात्र महाराष्ट्र यापासून दूर जातो. जनतेच्या मनात नकारात्मक विचार पेरले जात आहेत. यातून आपण बाहेर निघायला पाहिजे. राज्यातील विरोधी पक्षाने पुढाकार घेत महाराष्ट्राचे प्रश्न सरकारपुढे मांडायची गरज आहे. तसेच चुकीच्या गोष्टीवर बोलायला हरकत नाही, असेही बावनकुळे म्हणाले.