ETV Bharat / state

कोरोना रुग्ण आढळल्याने राहाता तालुक्यातील लोणी खु. परिसर कंटेनमेंट क्षेत्र घोषित

तालुक्यातील लोणी खु. परिसर कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने परिसर कंटेनमेंट क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. राहाता तहसीलदार तथा इन्सीडंट कमांडर कुंदन हिरे यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. त्यानुसार या क्षेत्रातील सर्व आस्‍थापना केंद्र, दुकाने, इत्‍यादी 2 ऑगस्टच्या रात्री 12 पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

लोणी खु. परिसर कंटेनमेंट क्षेत्र घोषित
लोणी खु. परिसर कंटेनमेंट क्षेत्र घोषित
author img

By

Published : Jul 24, 2020, 7:10 PM IST

अहमदनगर : जिल्ह्याच्या राहाता तालुक्यातील लोणी खु. परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. यात लोणी खु. गावातील समर्थ कॉलनी परिसर कंटेनमेंट क्षेत्र घोषीत करण्यात आले आहे. तसेच सदर क्षेत्रातील नागरिकांचे तसेच वाहनांचे आगमन व प्रस्थान तसेच वाहनांचे आवागमन प्रतिबंधित करण्यात आले आहे.

तालुक्यातील लोणी खु. परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने परिसर कंटेनमेंट क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. राहाता तहसीलदार तथा इन्सीडंट कमांडर कुंदन हिरे यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार या क्षेत्रातील सर्व आस्‍थापना, दुकाने, अत्‍यावश्‍यक सेवा, वस्‍तुविक्री इत्‍यादी 2 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या क्षेत्रात नागरिक आणि वाहनांच्या ये-जा करण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्‍यासाठी स्‍थानिक प्रशासनाने कार्यवाही करावी, असे सांगण्यात आले आहे.

यात, कोअर एरिया प्रतिबंधीत करणे, आत किंवा बाहेर जाण्याचा मार्ग बॅरिकेटिंग करावा, अत्यावश्यक सेवा व तातडीची वैद्यकीय सेवा वगळता कोणत्याही प्रकारची ये-जा होणार नाही व प्रतिबंधित क्षेत्रामधील व्यक्ती घर सोडून येऊ शकणार नाही. प्रतिबंधित क्षेत्रात जाणारा व्यक्ती तपासणी केल्याशिवाय आतमध्ये न सोडणे, प्रतिबंधीत क्षेत्रात जाणाऱ्या/येणाऱ्या व्यक्तींच्या दैनंदिन नोंदी ठेऊन साथरोड सर्वेक्षणामार्फत पाठपुरावा करण्यात यावा. प्रतिबंधीत क्षेत्रात विशेष पथकाद्वारे आदेशापासून 14 दिवसांपर्यंत घरोघरी सर्वेक्षण करुन संशयित रुग्णांचा शोध घेणे. शासनाच्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणे संशयितांचे तपासणी नमुने घेणे. सर्वप्रकारच्या धार्मिक व सामुदायिक कार्यक्रमाला बंदी, अत्यावश्यक कारणाशिवाय प्रतिबंधीत क्षेत्रातील व्यक्तींना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर निघण्यास प्रतिबंध आहे.

तसेच समन्वय अधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक क्षेत्रात जीवनावश्यक वस्तूंचा घरपोच सशुल्क पुरवठा करणे. शारीरिक अंतर आणि विलगीकरणाच्या नियमांचे कटाक्षाने पालन करणे, मशिद, मंदिर या ठिकाणी प्रार्थनेसाठी तसेच नमाज पठण, इफ्तार यासाठी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. बाधित व्यक्तीच्या संपर्कातील सर्व व्यक्तींचा शोध घेणे, प्रतिबंधित क्षेत्रात सर्वेक्षण, वैद्यकीय सुविधा व इतर समन्वयकाची जबाबदारी तालुका आरोग्य अधिकारी यांची राहील. दूध, किराणा, भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तू यांचे नियोजन संबधीत सहायक नियंत्रण अधिकारी तथा ग्रामसेवक यांनी करावे. प्रतिबंधीत क्षेत्रासाठी 24x7 पोलीस बंदोबस्त पोलीस निरीक्षक, लोणी यांनी लावावा असे आदेशात म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.