अहमदनगर - जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील बहिरवाडी येथील जागृत देवस्थान काळभैरवनाथची पौष महिन्यातील पाचही रविवारी येथे यात्रा भरते. यानिमित्त बहिरवाडीसह परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दाळ-भात, रोडग्याचा नेवैद्य दाखवण्याठी भाविक मोठ्या प्रमाणात येतात.

जागृत देवस्थान कालभैरवनाथ बहिरवाडी येथे पौष महिन्यातील दर रविवारी यात्रा भरते. या यात्रेमध्ये लाखो भाविक काळभैरवनाथाचे दर्शन घेतात. कालभैरवनाथाचे मुख्य मंदिर हे प्रवरा नदीच्या पात्रामध्ये आहे. श्रीकाल भैरवनाथाचे दर्शन घेऊन भाविक धन्यता मानता पौष महिन्यातील पाचव्या रविवारी सुमारे २ लाख भाविकांनी दिवसभरात दर्शन घेतले आहे. काल भैरवनाथांना दाळ-रोडग्याचा नेवैद्य महिला भक्तांनी अर्पण केला.
