अहमदनगर - शहरात कोरोना संसर्गाचे भयानक रुप आता समोर येत आहे. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर सामूहिक संसर्ग होतोय. नगर येथील अमरधाम मध्ये सरणावर एकाचवेळी 22 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. विद्युत दाहिनीत दिवसभरात 20 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिवसभरात एकूण तब्बल 42 जणांवर अंत्यसंस्कार झाल्याच समोर आले आहे.
अहमदनगर महापालिकेसमोर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याचं आव्हानं उभं राहिलं होतं. शववाहिनीतून एकाचवेळी सहा मृतदेह भरून अमरधाममध्ये नेण्याची नामुष्की महानगरपालिकेवर ओढावली आहे. अहमदनगर तसेच जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोनामुळे आत्तापर्यंत 1273 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीत 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यामुळे संख्येचा ताळमेळ बसत नाही. अहमदनगर जिल्हयात सध्या 11 हजार 237 अँक्टिव्ह रुग्ण आहेत.
ही आहे जिल्ह्यातील आकडेवारी
जिल्ह्यात आज(शुक्रवार) 1800 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 98 हजार 294 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 88.22 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज (शुक्रवार) जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 2022 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 11856 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २३५, अकोले ०२, जामखेड ३०, कर्जत २३, कोपरगाव ४२, नगर ग्रामीण १८, नेवासा ०३, पारनेर ०१, पाथर्डी ५६, राहता ०२, राहुरी ०३, संगमनेर ३७, श्रीगोंदा १७, श्रीरामपूर २४, कॅंटोन्मेंट बोर्ड ३० आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १६७, अकोले ४२, जामखेड ०३, कर्जत ०३, कोपरगाव ३५, नगर ग्रामीण २५, नेवासा ०८, पारनेर १०, पाथर्डी ०२, राहाता ८८, राहुरी १५, संगमनेर १०९, श्रीगोंदा ०३, श्रीरामपूर ३६, कॅंटोन्मेंट बोर्ड १८, इतर जिल्हा १३ आणि इतर राज्य ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज ९१६ जण बाधित आढळुन आले. मनपा १२४, अकोले ७६, जामखेड ३७, कर्जत ८८, कोपरगाव ५५, नगर ग्रामीण ७०, नेवासा ४३, पारनेर ३२, पाथर्डी ८८, राहाता ४७, राहुरी ६८, संगमनेर २३, शेवगाव ५२, श्रीगोंदा ४०, श्रीरामपूर ५४, कॅन्टोन्मेंट बोर्ड ०९ आणि इतर जिल्हा १० अशा रुग्णांचा समावेश आहे.
हेही वाचा-औरंगाबादमध्ये अंत्यविधीसाठी मिळेना जागा, मोकळ्या जागी अंत्यसंस्कारांची आली वेळ