ETV Bharat / state

डेअरी मालकाने दुधाचे पैसे न दिल्याने शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न - TRY

आपले तसेच इतर शेतकऱ्यांचे पैसे मिळवण्यासाठी नितीनने डेअरी मालकाकडे गेल्या काही दिवसांपासून तगादा लावला होता. परंतू, डेअरी मालकाने दूध बिलाचे पैसे देण्यास नकार दिला.

शेतकरी नितीन शिंदे
author img

By

Published : Feb 23, 2019, 1:42 PM IST

अहमदनगर - वारंवार तगादा लावूनही दूध डेअरी मालकाने दुधाचे पैसे न दिल्याने शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. नितीन शिंदे (वय २८, रा. रहीमपूर, ता. संगमनेर) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

नितीन शिंदे हे दूध उत्पादक शेतकरी असून, ते संकलित दूध धांदरफळ येथील श्रमिक मिल्क अॅन्ड फूड प्रोसेससी डेअरीला घालत होते. नितीन व काही दूध उत्पादक शेतकऱ्यांना या दूध संघाकडून बिलापोटी सुमारे ४ लाख २८ हजार रुपये येणे बाकी होते. आपले तसेच इतर शेतकऱ्यांचे पैसे मिळवण्यासाठी नितीनने डेअरी मालकाकडे गेल्या काही दिवसांपासून तगादा लावला होता. परंतू, डेअरी मालकाने दूध बिलाचे पैसे देण्यास नकार दिला. यावेळी नितीनने डेअरी मालकाला आपण विष पिऊन आत्महत्या करणार असल्याचे फोनवरून सांगितले. यावेळी तू माझ्या दुध संघासमोर येऊन विष पिलास तरी मला काही फरक पडणार नाही, असे डेअरी मालक म्हणाला. हे संभाषण नितीनच्या फोनवर रेकॉर्ड झाले असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

या घटनेमुळे संतापून नितीनने शुक्रवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घरात विष प्राशन केले. नितीनच्या घरच्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर, त्यांनी लगेचच त्याला संगमनेरमधील एका खाजगी रुग्णालयात हलविले. सध्या त्याची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अद्याप कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.

undefined

श्रमिक डेअरीचे अनिल नवले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की विष प्राशन केलेल्या व्यक्तीचा आणि आमच्या संस्थेचा प्रत्यक्षात कोणताही संबंध नाही. रहिमपूर येथील ज्या शेतकऱ्यांनी आमच्या दूध संघाला दूध घातले त्यांची बिले आम्ही अदा केली आहेत. नितीन यांच्याशी माझे गेल्या १० - १२ दिवसांपासून कुठल्याही प्रकारचे संभाषण झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.

Intro:

Shirdi_Ravimdra Mahale

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील श्रमिक मिल्क अँड फूड प्रोसेससीं या खाजगी दूधसंघाला घातलेल्या दुधाच्या बिलाची रक्कम वारंवार तगादा करूनही डेअरी मालकाने दुधाचे पैसे देण्यास नकार दिल्याने शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना तालुक्यातील रहीमपूर येथे घडली आहे....

याबाबत अधिक माहिती अशी कि, नितीन शिंदे (वय-२८, रा. रहीमपूर,ता. संगमनेर) असे यातील आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. नितीन शिंदे हे दूध उत्पादक शेतकरी असून आपल्या घरचे संकलित दूध एका खाजगी दूध डेअरीला देत होते. यापोटी नितीन व काही दूध उत्पादक शेतकऱ्यांना या दूध संघाकडून दूध बिलापोटी सुमारे ४ लाख २८ हजार रुपये येणे बाकी होते. आपल्या तसेच इतर शेतकऱ्यांचे पैसे मिळविण्यासाठी नितीन डेअरी मालकाकडे गेल्या काही दिवसांपासून तगादा करत होता. परंतु डेअरी मालकाने दूध बिलाचे पैसे देण्यास नकार दिला. यावेळी नितीन यांनी डेअरी मालकाला आपण विष पिऊन आत्महत्या करणार असल्याचे फोनवरून सांगितले. यावेळी तू माझ्या दुध संघासमोर येऊन विष पिलास तरी मला काही फरक पडणार नाही असे तो डेअरी मालक म्हणाला असल्याचे नितीन यांच्या फोनवर संभाषण रेकॉर्ड झाले असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले.याघटनेमुळे संतापून नितीन याने आज दि.२२ रोजी दुपारी अडीचच्या सुमारास घरात विष प्राशन केले. यावेळी नितीनच्या घरच्यांना जेंव्हा हि बाब लक्षात आली त्यांनी लगेचच त्याला संगमनेरातील एका खाजगी रुग्णालयात हलविले. सध्या त्याची प्रकृती अत्यंत नाजूक असून त्याच्यावर उपचार सुरु असे डॉक्टरांनी सांगितले आहे. याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अद्याप कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही....

श्रमिकचे अनिल नवले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, विष प्राशन केलेल्या व्यक्तीचा आणि आमच्या संस्थेचा प्रत्यक्षात कोणताही संबंध नाही. रहिमपूर येथील ज्या शेतकऱ्यांनी आमच्या दूध संघाला दूध घातले त्यांची बिले आम्ही अदा केली आहेत. नितीन यांच्याशी माझे गेल्या दहा बारा दिवसांपासून कुठल्याही प्रकारचे संभाषण झालेले नाही....Body:22 Feb Shirdi Sangamner Farmers Suicide AttemptsConclusion:22 Feb Shirdi Sangamner Farmers Suicide Attempts

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.