ETV Bharat / state

यंदाही भाविकांना साईबाबांचे दर्शन नाहीच! श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा - Shrikrishna Janmashtami

आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा केला जात आहे. शिर्डीच्या साईबाबा मंदीरातही हा उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. साईबाबांच्या मंदीरात चांदीच्या पाळण्यात श्रीकृष्णाची मुर्ती ठेऊन बाल कन्हैयाचे गुणगान केले गेले. रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्माचा उत्सव साजरा करण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षापासून चालत आली़ आहे.

श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा
श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा
author img

By

Published : Aug 31, 2021, 4:54 PM IST

अहमदनगर (शिर्डी) - देशभरात आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा केला जात आहे. शिर्डीच्या साईबाबा मंदीरातही हा उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. साईबाबांच्या मंदीरात चांदीच्या पाळण्यात श्रीकृष्णाची मुर्ती ठेऊन बाल कन्हैयाचे गुणगान केले गेले. रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्माचा उत्सव साजरा करण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षापासून चालत आली़ आहे.

श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा
श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा

कोरोनाच्या संकटामुळे भाविकांना दर्शनासाठी बंद

साईबाबांना श्रीकृष्णाचा अवतार मानत या पावन दिवशी साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी आणि दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यासाठी असंख्य भाविक साईदरबारी हजेरी लावत असतात. मात्र, गेल्या वर्षाभरापासून कोरोनाच्या संकटामुळे साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. त्यामुळे भाविकांना विना दर्शनाचे यावर्षी हा उत्सव साजरा करावा लागत आहे. आज दुपारी मध्यान्ह आरती अगोदर बारा वाजता साई समाधी समोर दहीहंडी फोडून श्री कृष्ण जन्माष्टमी उत्सव साजरा करण्यात आला आहे.

श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा
श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा

गोपाल कृष्णाचा फोटो ठेऊन त्याची पुजा केली जाते

गोकुळ अष्टमीच्या दिवशी साईंच्या मंदीरात कृष्ण जन्म आणि दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला आहे. चांदीच्या पाळण्यात बालकृष्णाची मुर्ती ठेऊन श्रीकृष्ण जन्माचे किर्तन झाल्यानंतर जन्म उत्वस साजरा करण्यात आला. गोपालकाल्याच्या दिवशी दिवसभर साईसमाधीवर गोपाल कृष्णाचा फोटो ठेऊन त्याची पुजा केली जाते. साईबाबांनी आपल्या जीवन काळात अनेक लिला दाखवल्या. साईबाबांनी एका भक्ताला कृष्णाच्या रुपात दर्शन दिल्याचेही म्हटले जाते. जगातील एकमेव अशी मस्जीत जिला द्वारकामाई म्हणून संबोधल जाते. ती शिर्डीत पाहायला मिळते. या ठिकाणी अनेक भक्त बाबांनी प्रज्वलीत केलेली धुनी पहाण्यासाठी आजही येतात. बाबा हेच आमचे राम, रहिम, कृष्ण, विठ्ठल म्हणत त्यांना अनेक भाविक विवीध रुपात दर्शन देत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.

ह.भ.प.उल्‍हास वाळुंजकर महाराज यांचे काल्‍याचे कीर्तन

आज सकाळी १० ते १२ यावेळेत श्री गोकुळाष्‍टमी उत्‍सवानिमित्‍त श्री साईबाबा समाधी मंदिरातील स्‍टेजवर मंदिर पुजारी ह.भ.प.उल्‍हास वाळुंजकर महाराज यांचे काल्‍याचे कीर्तन झाले. कीर्तनानंतर १२.०० वाजता संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांच्‍या हस्‍ते दहीहंडी फोडण्‍यात आली. यावेळी संस्‍थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, संरक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, पुजारी व कर्मचारी उपस्थित होते. सदरचा श्री गोकुळाष्‍टमी उत्‍सव कोरोना विषाणूच्‍या पार्श्‍वभूमीवर भाविकांविना व मर्यादित संस्‍थान अधिकारी आणि मंदिर पुजारी यांच्‍या उपस्थितीत यशस्‍वीरित्‍या पार पडला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.