ETV Bharat / state

Shrirampurs gas explosion incident : श्रीरामपूर गॅस गळती स्फोट: लेकीनंतर मातेचाही मृत्यू

author img

By

Published : Jan 18, 2022, 4:37 PM IST

Updated : Jan 18, 2022, 9:00 PM IST

श्रीरामपुर तालुक्यातील बेलापूरातील गाढे गल्लीत राहणारे शशिकांत शेलार यांच्या घरात सकाळी साडेसहा वाजता अचानक स्फोट ( Shrirampurs gas explosion incident ) झाला. या स्फोटामुळे घरावरील पत्रे उडून गेले. या दुर्घटनेत मुलीनंतर तिच्या मातेचाही मृत्यू झाला ( daughter mother death in gas explosion ) आहे.

जखमी महिलेचे निधन

अहमदनगर - श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूरातील गाढे गल्लीत गॅस गळतीमुळे स्फोट ( Shrirampurs gas explosion incident ) झाला होता. या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या महिलेचे आज निधन ( death of woman in gas explosion ) झाले आहे. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांची संख्या दोनवर पोहोचली आहे.

श्रीरामपुर तालुक्यातील बेलापूरातील गाढे गल्लीत राहणारे शशिकांत शेलार यांच्या घरात सकाळी साडेसहा वाजता अचानक स्फोट ( Shrirampurs gas explosion incident ) झाला. या स्फोटामुळे घरावरील पत्रे उडून गेले. बेलापुर परिसर या आवाजाने दणाणून गेला. यावेळी लागलेल्या आगीत शशिकांत शेलार, ज्योती शशिकांत शेलार, यश शशिकांत शेलार व नमश्री शशिकांत शेलार हे चौघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना प्रथम साखर कामगार हॉस्पिटल व त्यानंतर प्रवरा नगर येथे हलविण्यात आले होते.

श्रीरामपूर गॅस गळती स्फोट

हेही वाचा-ACB Summoned to Param Bir Singh : अनुप डांगे प्रकरणात परमबीर सिंग यांना एसीबीकडून समन्स

कुटुंबाला मिळाली 50 हजारांची आर्थिक मदत

उपचार सुरू असताना मुलगी नमश्री हिचे चार दिवसापूर्वीच निधन झाले होते. तर यश यास दवाखान्यातून घरी सोडण्यात आले होते. शशिकांत व त्याची पत्नी ज्योती यांच्यावर उपचार सुरुच होते. या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे पत्रकार देविदास देसाई यांनी 50 हजारांची आर्थिक मदत मिळवून दिली होती. दुर्घटनेतील ज्योती शशिकांत शेलार यांचेही उपचार सुरू असताना निधन झाले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा-Bulli Bai App Case : बुलीबाई अ‍ॅप प्रकरणातील आरोपींच्या जामिनावर आज पुन्हा सुनावणी

Last Updated : Jan 18, 2022, 9:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.