अहमदनगर - अर्थसंकल्पातून सर्वसामान्य जनतेची निराशा झाली आहे, असे मत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. ते आज संगमनेरमध्ये बोलत होते.
जनतेने एवढे मोठे बहुमत देऊनही जनतेला या अर्थसंकल्पातून काहीच मिळाले नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. यावेळी त्यांनी शेतकरी वर्गाला सरकारमध्ये काहीच स्थान नाही. तसेच अर्थसंकल्प जाहीर झाल्यावर शेअर बाजार कोसळतो यावरुनच अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचे उघड झाले आहे, असे वक्तव्य केले.