पिंप्री निर्मळ (अहमदनगर) Attack On Dalit Family : राज्यातील प्रसिद्ध राजकारणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राहाता मतदार संघातील पिंप्री निर्मळ गावात ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधकांचा प्रचार केल्याच्या राग मनात धरून दोन गटात वाद झाले होते. त्यानंतर सहा डिसेंबरच्या रात्री दीडशे ते दोनशे जणांनी गावातील दोन कुटुंबीयांच्या घरावर हल्ला करत घराची मोडतोड केली. तसंच वाहनांचंही नुकसान केलं. (atrocity filed in assault case)
पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात : या भांडणापूर्वीही गावातील दोन जणांमध्ये वाद झाले होते. त्या संदर्भात राहाता पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. काल रात्री झालेल्या जोरदार राड्यानंतर पोलिसांनी गावात येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी हल्लेखोरांविरुद्ध अॅट्रोसिटीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. सर्वच फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
एससी संघटनेचा पोलीस ठाण्यावर मोर्चा : लोणी पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची महिती मिळताच एससी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा मोठा जमाव, लोणी पोलीस ठाण्यात जमा झाला होता. यावेळी संबंधित आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा रिपाईंचे जिल्ह्याध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी दिला आहे. गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असून गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.
मागासवर्गीय महिलेला विवस्त्र करून मारहाण : माणुसकीला लाजवेल अशीच एक घटना बिहारमध्ये सप्टेंबर, 2023 मध्ये घडली होती. यामध्ये स्थानिक गुंडांनी मागासवर्गीय महिलेला विवस्त्र करून मारहाण केली. त्यानंतर नराधमांनी तिच्या तोंडात लघवी केली. मारहाणीनंतर गंभीर अवस्थेत महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही धक्कादायक घटना पाटणातील खुसरुपूर पोलीस ठाणे परिसरात घटना घडली होती. या घटनेनंतर मागासवर्गीय समाजात भीतीचे वातावरण पसरले.
हेही वाचा: