ETV Bharat / state

Ahmednagar Car Accident : भीषण कार अपघातात तीन मित्रांवर काळाचा घाला - अहमदनगरमध्ये तिघांचा मृत्यू

Ahmednagar Car Accident : श्रीगोंदा शहरातून ( Ahmednagar Shrigonda Accident Three Death ) आपल्या मित्राला काष्टी येथे सोडवण्यासाठी निघालेल्या मित्रांवर शेंडगेवाडी येथे ट्रॉलीला मागे धडकून झालेल्या भीषण कार अपघातात तिघांवर मृत्यू ( Three Friend Death in Car Accident ) ओढवला आहे. तर, त्या गाडीचेही मोठे नुकसान झाले आहे.

Ahmednagar Car Accident
अहमदनगर कार अपघात
author img

By

Published : Feb 13, 2022, 10:47 AM IST

अहमदनगर - श्रीगोंदा शहरातून (Ahmednagar Car Accident ) आपल्या मित्राला काष्टी येथे सोडवण्यासाठी निघालेल्या मित्रांवर शेंडगेवाडी येथे ट्रॉलीला मागे धडकून झालेल्या भीषण कार अपघातात तिघांवर मृत्यू ( Three Friend Death in Car Accident ) ओढवला आहे. तर, त्या गाडीचेही मोठे नुकसान झाले आहे.

कारचा चेंदामेंदा -

आज मध्यरात्री एक ते दीड च्या सुमारास झालेल्या या अपघातात केशव सायकर (वय २२वर्ष) राहणार काष्टी, आकाश रावसाहेब खेतमाळीस (वय १८ वर्ष) राहणार श्रीगोंदा व राहुल सुरेश आळेकर (वय वर्ष २२ वर्ष) राहणार श्रीगोंदा या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. केशवला काष्टीत सोडण्यासाठी निघालेल्या तिघांच्या गाडीला अनन्या हॉटेल समोर कार चालकाला पुढे असणाऱ्या ट्रॉलीचा अंदाज आला नसल्याने, ट्रॉलीला पाठीमागून कारची जोराची धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, त्या कारचा चेंदामेंदा झाला आहे. अपघातानंतर आसपासच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली.

'द्रुतगती मार्ग दोन शहरांना जोडणारे की...'

श्रीगोंदा काष्टी व नगर दौंड या द्रुतगती मार्गामुळे सर्वांनाच प्रवास करण्यास सुलभ झाले आहे. मात्र, सर्रास घडणाऱ्या या दुर्दैवी घटनांमुळे राज्य मार्ग किंवा द्रुतगती मार्ग दोन शहरांना जोडणारे की, व्यक्तीचे आयुष्य संपवणारे असे वाटू लागले आहे अशी प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिली आहे.

हेही वाचा - Saamana Editorial On BJP : लता दीदींच्या स्मारकावरून वाद हे रोगट मानसिकतेचे लक्षण! रोखठोक'मधून भाजपवर हल्ला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.