अहमदनगर - जिल्ह्यात हनी ट्रॅपचा प्रकार गेल्या तीन दिवसांपूर्वी समोर आले होते. एका श्रीमंत बागायतदाराकडून उसनवारी घेतलेले पैसे परत करण्याच्या बहाण्याने बोलवत महिलेने अश्लिल व्हिडिओ आणि फोटो काढले. त्यानंतर बागायतदाराला लाखोंनी लुटत ब्लॅकमेल केल्याची धक्कादायक घटना शिर्डीत समोर आली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेसह तिच्या एका साथीदाराला अटक केली आहे. त्यांना आज राहाता न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 13 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ( Ahmednagar Honey Trap case accused 13 days police custody )
अशी केली फसवणूक - 2018 साली पीडित बागायतदाराने आरोपी अनिता गोसावी यांना काही रक्कम उसनवारी दिली होती. मात्र संबधित महिला उसनवारी घेतलेले पैसे देण्यास टाळाटाळ करत होती. तगादा लावल्याने अखेर एक दिवस पैसे परत करण्याच्या बहाण्याने आरोपी महिलेने पीडित बागायतदाराला राहाता तालुक्यातील बाभळेश्वर याठिकाणी बोलवले. रस्त्यावर पैसे कसे मोजणार म्हणून एक हॉटेलच्या रुममध्ये नेले. आरोपी महिलेने स्वतःचे वस्त्र काढून टाकले. याचवेळी पाठीमागून आलेल्या आरोपी राजेंद्र गिरी याने संबधित घटनेचे चित्रीकरण आणि छायाचित्र काढले. त्यानंतर दोघांनी मिळून पीडित व्यक्तीकडे रक्कमेची मागणी करण्यास सुरुवात केली. पैसे दिले नाही तर संबंधित व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी दिली. पीडित व्यक्तीने अब्रूला घाबरत सुरुवातील 40 लाख 50 हजार रुपये दिले. मात्र त्यानंतर देखील ब्लॅकमेलिंगचा सिलसिला सुरुच राहिला. आरोपी महिलेने चार लाख रुपयांची आणखी मागणी केल्याने पीडित बागायतदाराने पोलिसात धाव घेतली. तिथे त्याने सर्व प्रकार सांगत तक्रार अर्ज दाखल केला.
आरोपींना 13 दिवसांची पोलीस कोठडी - शिर्डी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत खात्री करण्यासाठी प्री ट्रॅप पंचनामा तयार केला. पन्नास हजार रुपयांच्या खऱ्या नोटा आणि बंडलच्या खाली साधे कागद असे चार लाख रुपये तयार केले. शिर्डीतील हॉस्पिटल रोडवर पैसे घेण्यासाठी महिलेला बोलावले. संबंधित महिला घटनास्थळी आली तेव्हा ट्रॅप लावून पोलिसांनी तिला रंगेहाथ पकडले. मात्र तिला सहकार्य करणारा राजेंद्र गिरी हा आरोपी फरार होता. त्याला शिर्डी पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. आज राहाता न्यायालयात आरोपी राजेंद्र गिरी याला हजर केले असता न्यायालयाने 13 दिवसांची पोलीस कोठडी त्याला देण्यात आली आहे. आरोपी राजेंद्र गिरी याच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणामुळे संपूर्ण शिर्डीसह जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडाली होती. मात्र या प्रकरणातील महिला आरोपीला अटक करण्यात आली पण राजेंद्र गिरी हा आरोपी फरार होता. फरारी आरोपींचा तपास शिर्डी पोलीस स्टेशनचे उपविभागीय अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील व शिर्डी पोलीस करत होते. त्याला अटक करण्यासाठी विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात आली होती. अखेर शिर्डी पोलिसांनी आरोपी राजेंद्र गिरी यास अटक केली आहे. त्यास न्यायालयात गेले असता 13 दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील हे करत आहेत.
हेही वाचा - Bihar: सीतामढी येथून दोन चिनी नागरिकांना अटक; आसामचे एटीएम अन् सीम सापडले