ETV Bharat / state

पोटच्या मुलीवर अत्याचार करुन केलं गरोदर; साई संस्थानच्या सुरक्षा गार्डच्या सतर्कतेनं फरार बाप अटकेत - बलात्काऱ्याला शिर्डीत अटक

Rapist Arrested In Shirdi : पोटच्या मुलीवर बलात्कार करून फरार झालेल्या पुणे शहरातील नराधम बापाला एक महिन्यानंतर शिर्डी साईबाबा संस्थानच्या सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेने अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. (rape of own daughter) पुणे शहरातील वानवडी परिसरातील 50 वर्षीय नराधम बापाने आपल्या पोटच्या 16 वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.

Rapist Arrested In Shirdi
आरोपीला साई संस्थानच्या रक्षकांनी पकडले
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 28, 2023, 10:39 PM IST

आरोपीविषयी माहिती देताना पोलीस अधिकारी

शिर्डी (अहमदनगर) Rapist Arrested In Shirdi : पीडित मुलगी सात महिन्यांची गरोदर असल्याचं तिच्या आईच्या लक्षात आल्यानंतर 10 नोव्हेंबर रोजी वानवडी पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने आरोपी पती विरुद्ध तक्रार दिली होती. (Shirdi Sai park) पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून वानवडी पोलिसांनी आरोपी बापाविरोधात भादंवि कलम 376 /2 आणि बाल लैंगिक अपराध संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला होता. (father rape On daughter)

फिरून शिर्डीत शरण : गेल्या काही दिवसांपासून आरोपी राजस्थान, गुजरात आणि बंगळुरु येथे फिरला. अखेर त्यानं महाराष्ट्रात परतत साईबाबांच्या शिर्डीत आश्रय घेतला. साईबाबा संस्थानच्या साई उद्यान इमारतीत गेल्या 26 डिसेंबरपासून एक लॉकर भाड्याने घेत आरोपी राहत होता. मात्र, गुरुवारी लॉकरची मुदत संपूनही तो आरोपी लॉकर खाली करत नव्हता. त्याच्या वागण्याबद्दल संशय आल्यानं साई उद्यान इमारत प्रमुखांनी साईबाबा संस्थानचे सुरक्षा प्रमुख आण्णासाहेब परदेशी यांना माहिती दिली.

मोबाईलमुळे फुटले बिंग : अधिकारी आपल्या सुरक्षा रक्षकांसह घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आरोपीकडे असलेली बॅग चेक केली गेली. यावेळी बॅगमध्ये मोबाईल क्रमांक आढळून आला. या मोबाईल क्रमांकवर संपर्क साधल्यानंतर आरोपीच्या पत्नीने घडलेल्या घटनेसंदर्भात माहिती दिली. यानंतर साईबाबा संस्थानचे सुरक्षा अधिकारी अण्णासाहेब परदेशी यांनी या आरोपीला शिर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले. शिर्डी पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी या आरोपीबाबद पुणे वानवडी पोलिसांकडून माहिती घेतल्यानंतर पोटच्या मुलीवर बलात्कार करून फरार झाला असल्याचं आरोपीबाबत निष्पन्न झालंय.

वानवडी पोलीस ठाण्यात पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडितेवर पोटच्या बापाने गेल्या एप्रिल महिन्यापासून वारंवार बलात्कार करून तिला गरोदर केले होते. आरोपी 26 डिसेंबरपासून शिर्डीतील साई उद्यान येथे राहत होता. त्याला वारंवार रूम खाली करण्यास सांगूनही तो करत नसल्याने त्याच्या वर्तणुकीवर संशय आला. अखेर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर त्याच्या कुकृत्याचा भंडाफोड झाला - संदीप मिटके, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी

आरोपीला वानगडी पोलिसांच्या स्वाधीन केले जाणार: साई मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे अधिकारी आण्णासाहेब परदेशी यांच्या सतर्कतेमुळे आरोपीचे पितळ उघड पडले. माहिती कळताच शिर्डी पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी वानवडी पोलिसांशी संपर्क साधला. पुढे आरोपीला वानवडी पोलिसांच्या स्वाधीन करणार असून पुढील तपास वानवडी पोलीस करणार असल्याची माहिती दिली.

हेही वाचा:

  1. जे जे रुग्णालयातील डॉक्टर महेंद्र कुरा यांची बदली; डॉक्टरांनी घेतला संप मागे
  2. भारतीय मैदानावरील शेर दक्षिण आफ्रिकेत ढेर; एक डाव अन् 32 धावांनी भारताचा लाजिरवाणा पराभव
  3. मोदींची हुकूमशाही रोखायला एकत्र या! आंबेडकरांचे महाविकास आघाडीला आवाहन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.