ETV Bharat / state

अहमदनगरमध्ये बसवर कोसळले झाड; जीवितहानी नाही - कोसळले

पुण्याहून औरंगाबादकडे जाणाऱ्या एका धावत्या बसवर झाड कोसळले.

अहमदनगरमध्ये बसवर कोसळले झाड, सुदैवाने टळली जीवीतहानी
author img

By

Published : Jul 20, 2019, 9:51 PM IST

अहमदनगर- जिल्ह्यासह नगर शहरात आज (शनिवारी) दुपारी 3 नंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. यावेळी पुण्याहून औरंगाबादकडे जाणाऱ्या एका धावत्या बसवर झाड कोसळले. मात्र, सुदैवाने या झाडाच्या शेंड्याचा भाग बसच्या टपावर पडल्याने प्रवासी सुरक्षित आहेत. शहरातील आरटीओ कार्यालयाजवळील नटराज हॉटेल समोर हा प्रकार घडला.

अहमदनगरमध्ये बसवर कोसळले झाड, सुदैवाने टळली जीवीतहानी

स्थानिक नागरिकांनी बसवर पडलेले झाड बाजूला केले. या पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे. तर अनेक रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. पोलीस, महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या आपत्कालीन विभागाकडून अडचणीच्या ठिकाणी मदत पोहचविण्यात येत आहे.

Intro:अहमदनगर- वादळीवार्याने बस वर कोसळले झाड..सुदैवाने प्रवासी सुरक्षित..
Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_tree_on_bus_vij_7204297

अहमदनगर- वादळीवार्याने बस वर कोसळले झाड..सुदैवाने प्रवासी सुरक्षित..

अहमदनगर- जिल्ह्यासह नगर शहरात आज दुपारी तीन नंतर पावसाने जोरदार आणि दमदार हजेरी लावली. वादळीवारा आणि विजांच्या कडकडाटात कोसळलेल्या मान्सूनधारांनी नागरी जीवन पुरते कोलमडून टाकले. अशातच पुण्याहून औरंगाबाद कडे जाणाऱ्या एका धावत्या एस टी बसवर एक झाड कोसळले. मात्र सुदैवाने झाडाच्या शेंड्याचा भाग बस च्या टपावर पडल्याने कोणताही अनर्थ न होता बस मधील प्रवासी सुरक्षित राहिले. शहरातील आरटीओ कार्यालया जवळील नटराज हॉटेल समोर हा प्रकार घडला. स्थानिक नागरिकांनी धावपळ करत टपावर पडलेले झाड बाजूला केले.. केवळ तासाभरात झालेल्या या पावसाने शहरातील अनेक भागात पाणी साठले असून अनेक अपार्टमेंटच्या बेसमेंट मधील व्यापारी गाळे पाण्यात गेले आहेत.. अनेक रस्त्यांना पूरमय नदीचे स्वरूप आलेले होते. पोलीस, महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या आपत्कालीन विभागाच्या वतीने अडचणीत असलेल्या भागात मदत पोहचविण्यात येत आहे. मात्र कुठेही अनुचित दुर्घटना नसल्याचे सांगण्यात येत आहे..

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- वादळीवार्याने बस वर कोसळले झाड..सुदैवाने प्रवासी सुरक्षित..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.