टोकियो - भारतीय नेमबाज मनु भाकर टोकियोमधून भारतात परतली आहे. मनुला पदकाशिवाय परतावे लागले. पण तिने या अपयशातून सावरत पुढे पुनरागमन करू, असा विश्वास व्यक्त केला आहे.
19 वर्षीय मनुने, माजी प्रशिक्षक जसपाल राणा यांच्या वादामुळे ऑलिम्पिकच्या तिच्या तयारीवर परिणाम झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. राणा यांनी तिला 25 मीटर पिस्तूल स्पर्धेतून माघार घेण्यास सांगितल्याचे देखील मनु म्हणाली.
नेमबाज मनु भाकर इंदिरा गांधी विमानतळावर पीटीआयशी बोलताना म्हणाली, मी 25 मीटर स्पर्धेत नेमबाजी सुरू ठेवेन. युवा ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुल स्पर्धेची सुवर्ण पदक विजेता पुढे म्हणाली, नकारात्मकता आणि राणा यांच्यासोबतचा वाद याचा परिणाम ऑलिम्पिक तयारीवर झाला.
मनु म्हणाली की, तिला वारंवार 25 मीटर स्पर्धेतून माघार घ्यायला सांगण्यात आले. कारण यात तिची कामगिरी समाधानकारक नव्हती. दरम्यान, मनुने म्यूनिखमध्ये आयएसएसएफ विश्वकप स्पर्धेत टोकियो ऑलिम्पिकचा कोटा मिळवला होता. प्रशिक्षकांसोबतच्या वादात आई-वडिलांना देखील गोवण्यात आल्याचे देखील मनु म्हणाली.
हेही वाचा - Go For Gold! प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायकांनी दिल्या 'लवलिना बोर्गोहेन'ला अनोख्या शुभेच्छा
हेही वाचा - Tokyo olympic : अविश्वसणीय! सुवर्ण पदक जिंकण्यासाठी शार्लोट वर्थिंग्टनचा 360 डिग्री बॅकफ्लिप