ETV Bharat / sports

'गोल्डन बॉय' नीरज चोप्राची सत्काराच्या वेळी तब्येत बिघडली - golden-boy-neeraj-chopra

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याला गेल्या 3 दिवसापासून ताप येत होता. सततचे सत्कार कार्यक्रम तो करतोय. दरम्यान त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. आज तो आपल्या हरियानातील मूळ खंडारा या गावी पोहोचला मात्र स्टेजवरुनच त्याला रुग्णालयात नेण्यात आले. आता त्याची तब्येत बरी असल्याचे समजते.

नीरज चोप्राची सत्काराच्या वेळी तब्येत बिघडली

author img

By

Published : Aug 17, 2021, 10:43 PM IST

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राची प्रकृती बिघडली आहे. नीरज पदक जिंकल्यानंतर दहा दिवसांनी मंगळवारी पानिपतला पोहोचला. त्याचा ताफा समालखाच्या हलदना सीमेवरून खंडरा गावात पोहोचला. खंडरा येथे स्वागत कार्यक्रमाच्या दरम्यानच स्टेजच्या मागील बाजूने त्याला नेण्यात आले.

सांगितले जात आहे की, नीरजची तब्येत बिघडल्यानंतर कुटुंबाने त्याला रुग्णालयात नेले आहे. विशेष म्हणजे नीरजला गेल्या 3 दिवसांपासून ताप होता, परंतु त्याचा कोविड -19 ची चाचणी निगेटिव्ह आली होती. कार्यक्रम स्थळावू प्रचंड गर्दी झाल्याने कार्यक्रम रद्द करण्यात आला.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे हरियाणा सरकारच्या सन्मान सोहळ्यात भाग घेऊ नव्हता नीरज चोप्रा

टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राला ताप आणि घशाचा त्रास जाणवत होता. तथापि, दिलासा देणारी बाब आहे की त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे, हरियाणा सरकारने शुक्रवारी आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्यात नीरज भाग घेऊ शकला नाही.

तो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमाशी जोडला गेला होता. नीरज चोप्राचे सतत सत्कार होत आहेत. भारतात परतल्यापासून तो वेगवेगळ्या सोहळ्यांमध्ये सहभागी होत आला आहे.

गावात झाले होते भव्य स्वागत

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकल्यानंतर 10 दिवसांनी नीरज खंडरा येथील त्याच्या घरी आला आहे. सकाळी नीरज चोप्रा समालखा पुलाखाली पोहोचला. खंडरा गावात पोहोचल्यावर त्याचे गल्लीबाहेर भव्य स्वागत करण्यात आले. सकाळीच खंडरा येथील रहिवासी त्यांच्या स्वागतासाठी समालखा पुलाजवळ पोहोचले होते.

नीरजच्या स्वागतासाठी संपूर्ण गाव प्रतीक्षा करीत होते. खंडरा गावच्या मागे 5 किलो मीटरवर खुखराना गावातील लोकांनी त्याला चांदीचा भाला भेट दिला. सुरक्षेचा विचार करुन खंडरा गावात नीरजसाठी 100 मीटरचे स्टेज बनवण्यात आले होते. स्टेजपासून 20 मीटर दूरवर नीरजसाठी सुरक्षा रक्षक उभे करण्यात आले होते. त्यानंतर व्हीआयपींची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. मात्र स्टेजवरच त्याला त्रास व्हायला लागला. त्यानंतर त्याने संयोजकांनी त्याबद्दल सांगितले. अखेर त्याला स्टेजच्या मागून रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी तो चंदिगडला रवाना झाल्याचे सांगण्यात येते.

हेही वाचा -राशिद खान आणि मोहम्मद नबी Ipl 2021 खेळणार का? Srh ने दिलं उत्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.