ETV Bharat / sports

टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक विजेत्या खेळाडूंना बीसीसीआयकडून मोठं बक्षिस

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करत घोषणा केली. यात ते म्हणतात, सुवर्ण पदक जिंकणाऱ्याला 1 कोटी, रौप्य जिंकणाऱ्याला 50 लाख आणि कास्य पदक जिंकणाऱ्या खेळाडूला 25 लाख रुपये याशिवाय पुरूष हॉकी संघाला 1.25 करोड रुपयांचे बक्षिस देणार आहोत.

bcci-announced-prize-money-for-all-the-medal-winners-of-india
टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक विजेत्या खेळाडूंना बीसीसीआयकडून मोठं बक्षिस
author img

By

Published : Aug 8, 2021, 11:21 AM IST

टोकियो - शनिवारचा दिवस भारतीय क्रीडा इतिहासात सुवर्ण अक्षरात नोंदवला गेला. नीरज चोप्रा याने अॅथलेटिक्समध्ये भारताच्या झोळीत सुवर्ण पदक घालत इतिहास रचला. यासह टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पदकाची संख्या 7 इतकी झाली. टोकियोत पदक जिंकणाऱ्या खेळाडूंसाठी बीसीसीआयने मोठी घोषणा केली.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करत घोषणा केली. यात ते म्हणतात, सुवर्ण पदक जिंकणाऱ्याला 1 कोटी, रौप्य जिंकणाऱ्याला 50 लाख आणि कास्य पदक जिंकणाऱ्या खेळाडूला 25 लाख रुपये याशिवाय पुरूष हॉकी संघाला 1.25 करोड रुपयांचे बक्षिस देणार आहोत.

बीसीसीआयच्या घोषणेनुसार, नीरज चोप्रा याला 1 करोड, मीराबाई चानू आणि रवी कुमार दहिया यांना प्रत्येकी 50-50 लाख आणि पी. व्ही. सिंधू, लवलिना बोर्गोहेन, बजरंग पुनिया यांना प्रत्येकी 25-25 लाख रुपये मिळणार आहेत. याशिवाय भारतीय पुरूष हॉकी संघाने 41 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक जिंकलं आहे. यामुळे त्यांना 1.25 करोड बीसीसीआय देणार आहे.

बीसीसीआय शिवाय आयपीएलचा संघ चेन्नई सुपर किंग्जने नीरज चोप्रासाठी 1 करोड रुपयांच्या बक्षीसाची घोषणा केली आहे. नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 87.58 मीटर लांब भाला फेकला होता. यामुळे चेन्नई नीरज चोप्राच्या सन्मानासाठी 8758 नंबरची खास जर्सी तयार करणार आहे.

हेही वाचा - Tokyo Olympics: भारताचे राष्ट्रगीत ऐकताच नीरज चोप्रा झाला भावूक, व्हिडिओ होतोय व्हायरल

हेही वाचा - ऑलिम्पिकमध्ये दिले जाणारे सुवर्ण, रौप्य आणि कास्य पदकाची किंमत किती असते? जाणून घ्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.