ETV Bharat / sports

Wimbledon open : मेदवेदेव तिसऱ्या फेरीत, एलिना स्वितोलिनाचे आव्हान संपुष्टात

डॉनिल मेदवेदेवने विम्बल्डन स्पर्धेची तिसरी फेरी गाठली. महिला एकेरीत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेली एलिना स्वितोलिनाला पराभवाचा धक्का बसला.

wimbledon open elina-svitolina-out-of-tournament-daniil-medvedev-into-next-round
Wimbledon open : मेदवेदेवची तिसऱ्या फेरीत धडक, स्वितोलिनाचे आव्हान संपुष्टात
author img

By

Published : Jul 1, 2021, 10:34 PM IST

लंडन - रशियाचा स्टार टेनिसपटू डॉनिल मेदवेदेवने विम्बल्डन स्पर्धेची तिसरी फेरी गाठली. त्याने कार्लोस गार्फिया याचा ६-४, ६-१, ६-२ अशा सरळ सेटमध्ये एकतर्फा पराभव केला. दुसरीकडे महिला एकेरीत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेली एलिना स्वितोलिनाला पराभवाचा धक्का बसला.

विम्बल्डनच्या दुसऱ्या फेरीत युक्रेनची एलिना स्वितोलिनाचा सामना पोलंडच्या मागडा लिनेट हिच्याशी झाला. या सामन्यात मागडा हिने एलिनाचा ६-३, ६-४ असा धुव्वा उडवत एलिनाचे आव्हान संपुष्टात आणले. दरम्यान, डब्ल्यूटीए रॅकिंगच्या टॉप११ मधील आठ खेळाडू पराभव, माघार तसेच दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.

फ्रेंच ओपनची विजेती बारबरा क्रेजिकोव्हाने आंद्रिया पेटकोविचचा ७-५, ६-४ ने पराभव करत पुढील फेरी गाठली. बारबराचा हा सलग १४वा विजय आहे. ती फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन स्पर्धेत सलग सामने जिंकणाऱ्या सेरेना विल्यम्सचा विक्रम मोडण्याचा प्रयत्नात आहे.

अमेरिकेची शेल्बी रॉजर्सने जागतिक क्रमवारीत १५ व्या स्थानी असलेल्या मारिया सक्कारी हिचा ७-५, ६-४ ने पराभव करत तिसरी फेरी गाठली. जागतिक क्रमवारीत १६व्या स्थानावर असलेल्या अनास्तासिया हिने क्रिस्टीना प्लिसकोवाचा ६-३, ६-३ ने पराभव केला.

पुरुष गटात चौथ्या मानांकित अलेक्झेंडर ज्वेरेवने टेनिस सँडग्रेनचा ७-५, ६-२, ६-३ अशा फरकाने पराभव केला.

हेही वाचा - जगातील सर्वात युवा ग्रँडमास्टर! जाणून घ्या भारतीय वंशाचा अभिमन्यू मिश्राबद्दल

हेही वाचा - Tokyo Paralympics: वडिल वारल्यानंतर अवघ्या १२ दिवसातच निघाला ट्रेनिंग कॅम्पला, आज मिळवले ऑलिम्पिकचे तिकिट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.