टोकियो - टोकियो ऑलिम्पिकमध्ये जपानच्या नाओमी ओसाकाला पराभवाचा धक्का बसला. जागतिक क्रमवारीत 41व्या क्रमांकावर असणाऱ्या झेक रिपब्लिकच्या मार्केटा वोंड्रासोव्हाने नाओमी ओसाकाला पराभूत केले. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या ओसाकासाठी हा मोठ्ठा धक्का आहे.
झेक रिपब्लिकच्या मार्केटाने नाओमीला 6-1, 6-4 अशा सरळ सेटमध्ये पराभूत केला. मार्केटाने हा सामना 68 मिनिटात एकतर्फा जिंकला. या विजयासह मार्केटा उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली आहे. तर दुसरीकडे ओसाकाचे पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे.
हेही वाचा - VIDEO : चिमुकलीच्या वेटलिफ्टिंगची देशवासियांना भूरळ; मीराबाई चानूची देखील क्यूट प्रतिक्रिया
हेही वाचा - Tokyo Olympics : भारतीय बॉक्सर लवलिना बोर्गोहेन पदकापासून दोन पाऊल दूर