ETV Bharat / sports

प्राग चॅलेंजर : वावरिंकाची भारताच्या सुमित नागलवर सरशी - prague open quarter final २०२०

हा सामना एक तास १९ मिनिटे रंगला होता. उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी त्याने सुमितने जिरी लेहेचाचा पराभव केला. दोन तास रंगलेल्या या सामन्यात सुमितने लेहेचाला ५-७, ७-६(४) ६-३ने पराभूत केले. दुहेरीच्या सामन्यात भारताचा दिविज शरण आणि रॉबिन हासे यांनी जोनास फोरजेटेक आणि मायकेल व्रबेन्स्कीवर ६-३, ६-२ असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. तर, एन. श्रीराम बालाजीने बेल्जियमच्या किमर कोपेजन्सलसोबत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले आहे.

sumit nagal lose to stan wawrinka in prague open quarter final
प्राग चॅलेंजर : वावरिंकाची भारताच्या सुमित नागलवर सरशी
author img

By

Published : Aug 21, 2020, 11:43 AM IST

नवी दिल्ली - प्राग ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात तीन वेळा ग्रँड स्लॅम विजेता स्टॅन वावरिंकाने भारताच्या सुमित नागलवर मात केली. २३ वर्षीय सुमितने वावरिंकाविरूद्धचा पहिला सेट ६-२ असा खिशात घातला. मात्र, पुढच्या दोन सेटमध्ये वावरिकाने ६-०, ६-१ असे पुनरागमन करत सामना जिंकला.

हा सामना एक तास १९ मिनिटे रंगला होता. उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी त्याने सुमितने जिरी लेहेचाचा पराभव केला. दोन तास रंगलेल्या या सामन्यात सुमितने लेहेचाला ५-७, ७-६(४) ६-३ने पराभूत केले. दुहेरीच्या सामन्यात भारताचा दिविज शरण आणि रॉबिन हासे यांनी जोनास फोरजेटेक आणि मायकेल व्रबेन्स्कीवर ६-३, ६-२ असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. तर, एन. श्रीराम बालाजीने बेल्जियमच्या किमर कोपेजन्सलसोबत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले आहे.

युवा टेनिसपटू सुमित नागल याने मागील वर्षी झालेल्या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात प्रेक्षकांची मने जिंकली. पदार्पणात त्याचा सामना दिग्गज रॉजर फेडररविरुद्ध झाला होता. या सामन्यात त्याने फेडररला विजयासाठी चांगलेच झुंजवले. सुमितने पहिला सेटमध्ये धमाकेदार खेळी करत फेडररला ६-४ असे पराभूत केले. पण त्यानंतर फेडररने आपला अनुभव पणाला लावत सामना ४-६, ६-१, ६-२, ६-४ असा जिंकला. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या रॉजर फेडररने जरी सामना जिंकला तरीपण या सामन्यात सुमितच्या लढाऊवृत्तीची चर्चा जास्त झाली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.