ETV Bharat / sports

''तू म्हणाला होतास की आपण एकत्र टेनिस खेळू'', सानियाने केले भावनिक ट्विट

author img

By

Published : Jun 15, 2020, 3:56 PM IST

सुशांतच्या आत्महत्येनंतर सानियाने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. सानिया म्हणाली, ''सुशांत, तू म्हणाला होतास की आपण एक दिवस टेनिस खेळू. तू किती आनंदी होतास. जिथे जाशील तिथे तू आनंद वाटायचास. पण तू आतून किती दु:खी आहेस हे आम्हाला ठाऊक नव्हते. संपूर्ण जग तुझी आठवण काढेल. हे लिहिताना माझे हात थरथर कापत आहेत. सुशांत तुझ्या आत्म्याला शांती लाभो.''

saina mirza shared post after sushant singh rajputs death
''तू म्हणाला होतास की आपण एकत्र टेनिस खेळू'', सानियाने केले भावनिक ट्विट

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आपले जीवन संपवले. 'पवित्र रिश्ता' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या सुशांतने चित्रपट क्षेत्रातही नाव कमावले. सुंशातच्या मृत्यूनंतर अनेकांनी शोक व्यक्त केला. क्रीडाविश्वातूनही अनेक प्रतिक्रिया उमटल्या. भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झालाही सुशांतचे अचानक जाणे जिव्हारी लागले आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर सानियाने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. सानिया म्हणाली, ''सुशांत, तू म्हणाला होतास की आपण एक दिवस टेनिस खेळू. तू किती आनंदी होतास. जिथे जाशील तिथे तू आनंद वाटायचास. पण तू आतून किती दु:खी आहेस हे आम्हाला ठाऊक नव्हते. संपूर्ण जग तुझी आठवण काढेल. हे लिहिताना माझे हात थरथर कापत आहेत. सुशांत तुझ्या आत्म्याला शांती लाभो.''

  • Sushant 💔 💔 you said we would play tennis together one day .. you were so full of life and laughs .. spreading smiles everywhere you went.. we didn’t even know you were hurting this bad 😞 the world will miss you .. shaking while I write this .. RIP my friend

    — Sania Mirza (@MirzaSania) June 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सुशांतचा जन्म बिहारच्या पाटण्यात 21 जानेवारी 1986 ला झाला. सुशांतने मॅकेनिकल इंजिनियरींगचे शिक्षण पूर्ण केले होते. सुशांतने त्याच्या करिअरची सुरुवात 'किस देश मे है मेरा दिल' या मालिकेतून केली. मात्र, 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून सुशांत घराघरात पोहोचला. ती मालिका अर्ध्यावर सोडून सुशांतने त्याची पावले मोठ्या पडद्याकडे वळवली. सुशांतने 'काय पो छे' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने शुद्ध देसी रोमांस, पीके, धोनी द अनटोल्ड स्टोरी, केदारनाथ, सोनचिढीया आणि छिछोरे यासारख्या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.