पॅरीस - असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्सने (ATP) सोमवारी आपली जागतिक क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत स्वित्झर्लंडचा महान टेनिसपटू रॉजर फेडररने आपले तिसरे स्थान परत मिळवले आहे. फेडररने 5590 गुणांसह जर्मनीच्या अॅलेक्झांडर झ्वेरेव्हला मागे टाकत तिसरे स्थान काबीज केले. अॅलेक्झांडरला मुनिच ओपनमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्याने त्याची क्रमवारीत घसरण झाली आहे.
या क्रमवारीत सर्बियन टेनिस स्टार नोव्हाक जोकोव्हिचने 11160 गुणांसह आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. तर स्पेनचा राफेल नदाल 7765 गुणांसह दुसऱया स्थानी विराजमान आहे. महिलांच्या टेनिस क्रमवारीत जपानची नाओमी ओसाका अव्वल, चेक प्रजासत्ताकची पेत्रा क्विटोवा दुसऱया तर रोमानियाच्या सिमोना हालेपने तिसऱ्या स्थानी आहे.
एटीपीच्या जागतिक क्रमवारीतील पहिले 5 खेळाडू
- नोव्हाक जोकोव्हिच - 11160 गुण
- राफेल नदाल - 7765 गुण
- रॉजर फेडरर - 5590 गुण
- अॅलेक्झांडर झ्वेरेव्ह - 5565 गुण
- डॉमिनिक थिएम - 5085 गुण