ETV Bharat / sports

ऑस्ट्रेलियन ओपन : १५ वर्षाच्या कोकोचा गतविजेत्या ओसाकाला धक्का! - नाओमी ओसाका ऑस्ट्रेलियन ओपन न्यूज

एक तास ७ मिनीटे रंगलेल्या या स्पर्धेच्या तिसऱया सामन्यात  कोकोने ओसाकाला ६-३, ६-४ अशा सरळ सेटमध्ये नमवले. कोको आणि ओसाका दुसऱ्यांदा आमने सामने आले. याआधी, मागील वर्षी झालेल्या युएस ओपनमध्ये ओसाकाने गॉफवर सरशी साधली होती.

coco gauff beat naomi osaka in australian open
ऑस्ट्रेलियन ओपन : १५ वर्षाच्या कोकोचा गतविजेत्या ओसाकाला धक्का!
author img

By

Published : Jan 24, 2020, 4:48 PM IST

मेलबर्न - अमेरिकेची चॅम्पियन महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्स तिसऱ्या फेरीत गारद झाल्यानंतर, ऑस्ट्रेलियन ओपनची गतविजेती जपानची नाओमी ओसाकाही स्पर्धेबाहेर पडली आहे. मागच्या वर्षी झालेल्या विम्बल्डन स्पर्धेत दिग्गज टेनिसस्टार व्हिनस विलियम्सला हरवणाऱ्या १५ वर्षाच्या कोको गॉफने ओसाकाला स्पर्धेबाहेर ढकलले.

हेही वाचा - 'पाकिस्ताकडे विराटपेक्षा चांगले खेळाडू, पण.....'

एक तास ७ मिनिटे रंगलेल्या या स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्यात कोकोने ओसाकाला ६-३, ६-४ अशा सरळ सेटमध्ये नमवले. कोको आणि ओसाका दुसऱ्यांदा आमने सामने आले. याआधी, मागील वर्षी झालेल्या युएस ओपनमध्ये ओसाकाने गॉफवर सरशी साधली होती. कोको पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहभागी झाली असून ओसाकाने मागच्या वर्षी सेरेवनाला हरवून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.

मागच्या वर्षी झालेल्या विम्बल्डन स्पर्धेत कोकोने ३९ वर्षीय व्हिनस विलियम्सला ६-४, ६-४ असे हरवत टेनिस विश्वात खळबळ उडवून दिली होती. एक खास गोष्ट म्हणजे कोकोचा जन्म झाला होता तेव्हा व्हिनस विलियम्सने ४ ग्रँडस्लॅम जिंकले होते.

Intro:Body:

ऑस्ट्रेलियन ओपन : १५ वर्षाच्या कोकोचा गतविजेत्या ओसाकाला धक्का!

मेलबर्न - अमेरिकेची चॅम्पियन महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्स तिसऱ्या फेरीत गारद झाल्यानंतर, ऑस्ट्रेलियन ओपनची गतविजेती जपानची नाओमी ओसाकाही स्पर्धेबाहेर पडली आहे. मागच्या वर्षी झालेल्या विम्बल्डन स्पर्धेत दिग्गज टेनिसस्टार व्हिनस विलियम्सला हरवणाऱ्या १५ वर्षाच्या कोको गॉफने ओसाकाला स्पर्धेबाहेर ढकलले.

हेही वाचा -

एक तास ७ मिनीटे रंगलेल्या या स्पर्धेच्या तिसऱया सामन्यात  कोकोने ओसाकाला ६-३, ६-४ अशा सरळ सेटमध्ये नमवले. कोको आणि ओसाका दुसऱ्यांदा आमने सामने आले. याआधी, मागील वर्षी झालेल्या युएस ओपनमध्ये ओसाकाने गॉफवर सरशी साधली होती. कोको पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहभागी झाली असून ओसाकाने मागच्या वर्षी सेरेवनाला हरवून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.

मागच्या वर्षी झालेल्या विम्बल्डन स्पर्धेत कोकोने ३९ वर्षीय व्हिनस विलियम्सला ६-४, ६-४ असे हरवत टेनिस विश्वात खळबळ उडवून दिली होती. एक खास गोष्ट म्हणजे कोकोचा जन्म झाला होता तेव्हा व्हिनस विलियम्सने ४ ग्रँडस्लॅम जिंकले होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.