मेलबर्न - जपानची नोओमी ओसाका आणि रोमानियाची सिमोना हालेप या दोघींनी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेची तिसरी फेरी गाठली आहे.
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या ओसाकाने दुसऱ्या फेरीत फ्रान्सच्या कॅरोनिल गार्सिया हिचा पराभव केला. ओसाकाने गार्सियाविरुद्धचा सामना १ तास १ मिनिटात ६-२, ६-३ अशा फरकाने जिंकला.
जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या हालेपने ऑस्ट्रेलियाच्या एजला टॉमजानोविच हिचा २ तास ३४ मिनिटे रंगलेल्या सामन्यात पराभव केला. हालेपने ४-६, ६-४, ७-५ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला.
स्थानिक टॉमजानोविच हिने हालेपला पहिल्या सेटमध्ये पराभूत केले. तिने पहिला सेट ६-४ अशा फरकाने जिंकला. यानंतर हालेपने आपला अनुभव पणाला लावत दुसरा सेट ६-४ ने जिंकत सामना बरोबरीत आणला. निर्णायक सेट हालेपने ७-६ ने जिंकत तिसरी फेरी गाठली.
हेही वाचा - पेत्रा क्वितोवा, व्हिनस विल्यम्स यांना ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुसऱ्या फेरीतच बाहेर होण्याची नामुष्की
हेही वाचा - Australian Open : उलटफेर... बियांका ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतून बाहेर, सू-वेईने दिला धक्का