ETV Bharat / sports

जागतिक बुद्धिबळ स्पर्धा 2021 पर्यंत स्थगित

यावर्षी 20 डिसेंबरपासून दुबई येथे ही स्पर्धा सुरू होणार होती. मात्र, कोरोनाव्हायरसचा धोका लक्षात घेता ही स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

author img

By

Published : Jun 29, 2020, 2:53 PM IST

World chess championship postponed to 2021
जागतिक बुद्धिबळ स्पर्धा 2021 पर्यंत स्थगित

नवी दिल्ली - विश्व बुद्धिबळ संघटनेने (एफआयडीई) यावर्षी डिसेंबरमध्ये होणारी जागतिक बुद्धिबळ स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनला आपले जेतेपद टिकवून ठेवण्यासाठी पुढच्या वर्षापर्यंत थांबावे लागणार आहे.

यावर्षी 20 डिसेंबरपासून दुबई येथे ही स्पर्धा सुरू होणार होती. मात्र, कोरोनाव्हायरसचा धोका लक्षात घेता ही स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एफआयडीईचे महासंचालक इमिल सुतोवस्की म्हणाले, की या वर्षाच्या शेवटी उमेदवारांची स्पर्धा घेण्याची योजना आहे परंतु जागतिक स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. आम्ही या निर्णयापर्यंत पोहोचलो आहोत, की जागतिक बुद्धिबळ स्पर्धा या वर्षी आयोजित करणे अशक्य आहे. पुढच्या वर्षी मार्च किंवा ऑक्टोबरमध्ये या स्पर्धेचे आयोजन केले जाईल.

ही स्पर्धा यावर्षी दुबई एक्स्पो दरम्यान आयोजित करण्याचे नियोजित होते. नवीन वेळापत्रकानुसार, 1 ऑक्टोबर 2021 रोजी दुबई एक्सपो घेण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.