ETV Bharat / sports

Tokyo Olympics : 'सुपर मॉम' मेरी कोमच्या पंचची कमाल, गाठली प्री-क्वार्टर फायनल

भारताची महिला बॉक्सिंगपटू मेरी कोमने टोकियो ऑलिम्पिकमध्ये विजयी सुरूवात केली.

Tokyo Olympics : Mary Kom through to Last 16, defeats Hernandez Garcia in opening round
Tokyo Olympics : 'सुपर मॉम' मेरी कोमच्या पंचचा कमाल, गाठली दुसरी प्री-क्वाटर फायनल
author img

By

Published : Jul 25, 2021, 2:54 PM IST

टोकियो - भारताची महिला बॉक्सिंगपटू मेरी कोमने टोकियो ऑलिम्पिकमध्ये विजयी सुरूवात केली. तिने पहिल्या सामन्यात सहज विजय मिळवला. मेरीने राउंड ऑफ 32 मध्ये डेमिनिकन गणराज्यच्या मिग्वेलिना गार्सिया हर्नाडेज हिचा 4-1 असा सहज पराभव केला.

सहावेळची विश्वविजेती मेरी कोमकडून भारताला पदकाच्या आशा आहेत. मेरी कोमने देखील याची सुरूवात धडाक्यात करत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. तिचा पुढील सामना 29 जुलै रोजी कोलंबियाच्या तिसऱ्या मानांकित वालेंरिसाय व्हिक्टोरिया हिच्याशी होणार आहे.

मेरी कोम विषयी...

मेरी कोम इम्फाळ मणीपूरची आहे. तिने आतापर्यंत सहा वेळा जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. याशिवाय तिने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले आहे. आशियाई स्पर्धेत मेरीने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती.

बॉक्सर विकास कृष्णला पराभवाचा धक्का

भारताचा अनुभवी बॉक्सर विकास कृष्णला पराभवाचा धक्का बसला. 69 किलो वजनी गटाच्या 32 राउंडमध्ये जपानच्या सेवोनरेट्स ओकाजावा याने विकासचा पराभव केला. या पराभवासह विकासचे ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आले.

हेही वाचा - मोफत पिझ्झा ते ही आयुष्यभर; रौप्य पदक विजेती मीराबाई चानूसाठी पिझ्झा कंपनीची घोषणा

हेही वाचा - Tokyo Olympic मध्ये पाकची दुर्दशा पाहून भडकला क्रिकेटर; म्हणाला लाज वाटली पाहिजे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.